Elec-widget

GST काउन्सिलची बैठक 20 जूनला, 'या' वस्तू होणार स्वस्त

GST काउन्सिलची बैठक 20 जूनला, 'या' वस्तू होणार स्वस्त

बजेटआधी जीएसटी काउन्सिलची बैठक आहे. त्यात सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही वस्तू स्वस्त केल्या जातील.

  • Share this:

मुंबई, 10 जून : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातली पहिली जीएसटी काउन्सिलिंग बैठक होणार आहे. त्यात अनेक वस्तू स्वस्त होतील. CNBC आवाजच्या सूत्रांच्या माहितीनुसार सध्या वस्तूच्या मागण्या कमी झाल्यात. त्यामुळे वस्तू आणि सेवा करात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 28 टक्के टॅक्स स्लॅबमधल्या बऱ्याच गोष्टी काढून टाकल्या जातील. काही राज्यांनी कर दर कमी करण्याचं समर्थन केलंय. जीएसटी काउन्सिल बैठकीत इलेक्ट्राॅनिक चलन सुरू करण्याच्या प्रस्तावावरही विचार होऊ शकतो.

5 जुलै रोजी बजेट सादर होईल. त्याआधी जीएसटी काउन्सिलिंगची बैठक 20 जूनला होऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होईल.

कार इन्शुरन्स ऑनलाइन अपडेट करणं एकदम सोपं, 'या' आहेत 5 स्टेप्स

या वस्तू होऊ शकतात स्वस्त - सध्या मागणी खूप कमी झालीय. अर्थव्यवस्थेत सुस्ती आलीय. हे असंच राहिलं, तर नोकऱ्यांवरही संकट येऊ शकतं.

सरकारी नोकरी हवी? स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी आहे 'इतक्या' जागांवर भरती

Loading...

28 टक्के जीएसटी ब्रॅकेटमध्ये आॅटोमोबाइल्स आहे. कार्सवर त्यांच्या आकार आणि सेगमेंटनुसार सेसही लावला जातो. रेट कमी केला तर कार्सच्या किमतीही कमी होऊ शकतात. मग मागणीही वाढेल.

वर्षभर या उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय

जीएसटीच्या 28 टक्के स्लॅबमध्ये लक्झरी आयटम्स येतात. त्यात छोट्या कार्स, एसी, फ्रीज, प्रीमियम कार्स, सिगरेट, महागडी मोटारसायकल या गोष्टी येतात. त्या स्वस्त होऊ शकतात.

भारतीय अर्थकारणाची वाढ 2019च्या आर्थिक वर्षात 6.8 टक्के होता. पाच वर्षातली ही सर्वात खालची पातळी. जानेवारी-मार्च या तिमाहीत तो 5.8 टक्के होता. ही वाढ सर्वात कमी होती.


SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...