मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2000 च्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात बँकेकडून मिळतील रुपये, कुठे आणि कशी बदलाल ही नोट?

2000 च्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात बँकेकडून मिळतील रुपये, कुठे आणि कशी बदलाल ही नोट?

नोटेच्या स्थितीच्या आधारावर तुम्हाला देशभरातील आरबीआय कार्यालयांमध्ये आणि नामांकित बँक शाखांमध्ये सदोष नोटा बदलल्या जाऊ शकतात.

नोटेच्या स्थितीच्या आधारावर तुम्हाला देशभरातील आरबीआय कार्यालयांमध्ये आणि नामांकित बँक शाखांमध्ये सदोष नोटा बदलल्या जाऊ शकतात.

नोटेच्या स्थितीच्या आधारावर तुम्हाला देशभरातील आरबीआय कार्यालयांमध्ये आणि नामांकित बँक शाखांमध्ये सदोष नोटा बदलल्या जाऊ शकतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: फाटलेल्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नियमानुसार, नोटेच्या स्थितीच्या आधारावर तुम्हाला देशभरातील आरबीआय कार्यालयांमध्ये आणि नामांकित बँक शाखांमध्ये सदोष नोटा बदलल्या जाऊ शकतात. जर तुमच्याकडेही फाटलेली नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जाणून घ्या तुम्ही या फाटलेल्या नोटा कुठून आणि कशा बदलू शकता. आणि त्या बदल्यात बँक तुम्हाला किती पैसे देते? (Reserve Bank of India News) याठिकाण बदलता येईल फाटलेली नोट तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँक शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता. परंतु ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. मात्र बँक कर्मचारी तुमच्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्व बँकांना स्पष्टपणे निर्देशित केले आहे की सदोष किंवा फाटलेल्या नोटा बदलून देण्यात याव्या. यासह, त्यांना त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेबद्दल फलकही लावले जावेत. हे वाचा-HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! 18 तासांसाठी बंद राहणार बँकेच्या सेवा 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात किती पैसे मिळतील? आरबीआयच्या मते, नोट किती फाटली आहे या स्थितीवर त्यासाठीचं मुल्य निर्भर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, फाटलेल्या नोटांच्या बाबतीत, जर फाटलेल्या नोटेचा सर्वात मोठा अविभाजित भाग एकूण नोटेच्या  80% पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला पूर्ण परतावा मिळेल. जर सर्वात मोठा तुकडा 40% क्षेत्रापेक्षा मोठा असेल, परंतु 80% पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला नोटचे फक्त अर्धे मुल्य मिळेल. जर सर्वात मोठा भाग 40% क्षेत्रापेक्षा लहान असेल तर तुम्हाला अजिबात रिफंड मिळणार नाही. हे वाचा-SBI च्या ग्राहकांनी लक्षात ठेवा हे दोन नंबर, बँकेने दिली महत्त्वाची माहिती बँकांकडून कोणतीही फी घेतली जात नाही फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँकांकडून कोणतीही फी आकारली जात नाही. बँक अशा नोटा घेण्यास नकार देतात ज्या पूर्णपणे खराब झाल्या असतील किंवा जळलेल्या असतील. नोट जाणूनबुजून कापल्याचा संशय आल्यास देखील बँक नोट बदलून देत नाही.
First published:

Tags: Money, Rbi, Rbi latest news

पुढील बातम्या