Home /News /money /

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीएम किसान योजनेंतर्गत सरकारनं केली मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीएम किसान योजनेंतर्गत सरकारनं केली मोठी घोषणा

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली.

    नवी दिल्ली 18 मार्च : तुम्हीदेखील पीएम किसान योजनेंतर्गत योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पूर्वीप्रमाणे वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) देशातील शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 डिसेंबर 2019 पासून आधार आवश्यक झाला आहे. काय म्हणाले कृषीमंत्री - ही रक्कम दोन हजार रुपयांप्रमाणे तीन टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. तोमर यांनी लोकसभेत म्हटलं, की पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ते म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. महाराष्ट्रात पीएम किसान योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांकडून या रकमेची वसूली करण्यात आल्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना तोमर म्हणाले, की केंद्र सरकारनं यंदा 11 मार्चला तब्बल 78.37 कोटी रुपयांची वसुली केली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: BJP, Modi government, PM Kisan, PM narendra modi, Scheme

    पुढील बातम्या