2020मध्ये भारताचा GDP उडवणार सर्वांची झोप, पण 2021मध्ये चीनला टाकणार मागे-IMF

ल्या आठवड्यात जागतिक बँकेने असे म्हटले होते की या आर्थिक वर्षात भारताचा GDP 9.6 टक्क्यांनी कमी होईल.

ल्या आठवड्यात जागतिक बँकेने असे म्हटले होते की या आर्थिक वर्षात भारताचा GDP 9.6 टक्क्यांनी कमी होईल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चालू वर्ष चांगले नाही आहे. मात्र 2021 मध्ये भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला आहे. दरम्यान, याआधी गेल्या आठवड्यात जागतिक बँकेने असे म्हटले होते की या आर्थिक वर्षात भारताचा GDP 9.6 टक्क्यांनी कमी होईल. या व्यतिरिक्त मूडीजसह अनेक बड्या रेटिंग एजन्सींनी आधीच जीडीपीमध्ये घट होईल अशी शक्यता वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मते कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे या वर्षात भारताचा GDP 10.3 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र IMFनं असेही म्हटले आहे की. 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 8.8 टक्क्यांनी वाढेल. वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बँकेतून खरेदी करू नका सोन्याची नाणी, हे आहे कारण भारत चीनला टाकणार मागे 2021मध्ये भारत चीनला मागे टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. IMFच्या मते, चीनमध्ये 2021 पर्यंत 8.2 टक्के वाढ होईल. तर , भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 8.8 टक्के होईल. IMFनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, GDPमधील वाढ हे भारतात जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 4.2 टक्के होता. वाचा-इथं मिळतायेत चिनी वस्तूंपेक्षाही स्वस्त वस्तू; दिवाळीसाठी घरबसल्याच द्या ऑर्डर जागतिक अर्थव्यवस्थेत 4.4 टक्के घट IMFच्या ताज्या रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4..4 टक्क्यांनी घसरू शकेल. त्याच वेळी, 2021 मध्ये 5.2 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह पुढे जाण्याची अपेक्षा आहे. IMFच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की 2020मध्ये जगातील बड्या अर्थव्यवस्थांमध्ये चीन हा एकमेव देश असेल जो 1.9 टक्के वाढ नोंदवेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published: