मराठी बातम्या /बातम्या /मनी /

भारताचा आर्थिक विकासदर आणखी खालावणार; IMF ने प्रसिद्ध केले धास्तावणारे आकडे

भारताचा आर्थिक विकासदर आणखी खालावणार; IMF ने प्रसिद्ध केले धास्तावणारे आकडे

भारतात आर्थिक विकासाचा दर 6.1 टक्क्यांवरून घसरून 4.8 टक्के असेल असं IMF च्या वतीने नोंदवलं गेलं आहे.

भारतात आर्थिक विकासाचा दर 6.1 टक्क्यांवरून घसरून 4.8 टक्के असेल असं IMF च्या वतीने नोंदवलं गेलं आहे.

भारतात आर्थिक विकासाचा दर 6.1 टक्क्यांवरून घसरून 4.8 टक्के असेल असं IMF च्या वतीने नोंदवलं गेलं आहे.

  • Published by:  Arundhati Ranade Joshi
दावोस (स्वित्झर्लंड), 20 जानेवारी :  भारताचा आर्थिक विकासदर अपेक्षेपेक्षाही खाली येण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF ने (International Monetary Fund) नोंदवली आहे. दावोस इथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या  (WEF )पार्श्वभूमीवर जगभरातच 2020-21 या आर्थिक वर्षात विकासदर कमी राहील आणि भारतातली आर्थिक मंदी हे त्याचं कारण असेल, असा अंदाज IMF ने नोंदवला आहे. IMF च्या प्रमुख अर्थतज्ज्ञ या पदावर मुळची भारतीय व्यक्ती आहे. जगातल्या निष्णात अर्थतज्ज्ञ म्हणून नावाजलेल्या गीता गोपिनाथ यांनी भारतीय सरकारने पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर नॉन परफॉर्मिंग असेट्स वाढणार नाहीत, याची काळजीही भारत सरकारला घ्यावी लागेल, असं त्या CNBC TV18 शी बोलताना म्हणाल्या. IMF ने आपल्या अहवालात जागतिक विकासदरातही घट होणार असल्याचं अनुमान वर्तवलं आहे. यामागे भारतीय बाजारपेठेतली मंदी हे कारण देण्यात आलं आहे. भारतात आर्थिक विकासाचा दर 6.1 टक्क्यांवरून घसरून 4.8 टक्के असेल असं IMF च्या वतीने नोंदवलं गेलं आहे. बँकिंगव्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये असलेली मंदी आणि ग्रामीण भारतात उत्पन्न कमी होत असल्यामुळे विकासदर कमी होईल, असं अनुमान काढण्यात आलं आहे. IMF च्या प्रमुख अर्थतज्ज्ञ या पदावर सध्या भारतीय व्यक्तीच आहे हे विशेष.    हार्वर्ड स्कॉलर आणि अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(इंटरनॅशनल मॉनिटरी फंड)प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून निवड झाली. गेल्या जानेवारीपासून त्या या आंतरराष्ट्रीय संस्थेवर कार्यरत आहेत.  या जागी निवड झालेल्या त्या पहिल्या स्त्री अर्थतज्ज्ञ आहेत आणि मूळच्या भारतीय आहेत. अन्य बातम्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस भारतात किराणा मालाच्या दुकानात जाऊन विकतोय सामान सोनं खरेदीबद्दल हा नियम पाळला नाहीत तर होईल शिक्षा सोन्याचे दर घसरले, बाजारात विक्रीसाठी आल्या सोन्याच्या खिडक्‍या!
First published:

Tags: Economic crisis, Gita gopinath, Imf

पुढील बातम्या