मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नशीबानं मिळते अशी कंपनी! आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा

नशीबानं मिळते अशी कंपनी! आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा

नशीबानं मिळते अशी कंपनी! आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा

नशीबानं मिळते अशी कंपनी! आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा

IKEA India: कोणताही कर्मचारी थर्ड पार्टी रोलवर नाही. त्यांना कामाच्या तासांच्या आधारे पगार मिळतो. कोणताही कर्मचारी आपल्या सोयीनुसार त्याची निवड करू शकतो. याशिवाय त्यांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय आणि विमा लाभही मिळतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 28 सप्टेंबर: जगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी IKEA चे भारतात 3,000 कर्मचारी आहेत. यातील सुमारे एक चतुर्थांश कर्मचारी अर्धवेळ काम करत आहेत. ते आठवड्यातून फक्त दोन दिवस काम करतात. IKEA चे बहुतेक अर्धवेळ कर्मचारी विद्यार्थी आणि महिला आहेत, जे त्यांच्या गरजेनुसार काम करतात. अशा प्रकारे देशात एक गिग वर्कर (Gig Worker) आकार घेत आहे. गिग वर्करला कामाच्या आधारे वेतन मिळतं, ते स्वतंत्रपणे ऑनलाइन काम करतात.

असाइनमेंट बेस्ड काम-

स्वीडिश फर्निचर रिटेलर IKEA च्या कंट्री पीपल आणि कल्चर मॅनेजर परिणिता सेसिल लाक्रा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "आज आमच्याकडे स्टोअरमध्ये सुमारे 25 टक्के अर्धवेळ असाइनमेंट बेस्ड रोल आहेत. हे युनिटनुसार बदलते. बंगळुरूमध्ये 40 टक्के अर्धवेळ काम करतात.

थर्ड पार्टी पे-रोल पर नहीं -

ते म्हणाले की पार्टटाईम काम करणारे कर्मचारी हे आयकेईए इंडियाचे कर्मचारी आहेत. कोणताही थर्ड पार्टीशी ते संबंधित नाही. त्यांचा पगार हा कामाच्या तासांवर अवलंबून आहे. कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार ते निवडू शकतात. याशिवाय त्यांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय आणि विमा लाभही मिळतात. पार्ट टाईम कर्मचारी स्टोअर आणि ऑफिस या दोन्ही भूमिकांमध्ये काम करतात. हे कर्मचारी सेल्स, लॉजिस्टिक, कस्टमर इंटरअॅक्शन यांसारख्या विभागात काम करतात.

हेही वाचा:  ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ 5 नवीन नियम, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

विद्यार्थी आणि महिला-

काही कर्मचारी आठवड्यातून 16 तास, 24 तास किंवा दिवसाचे 30 तास काम करत असू शकतात. काही जण फक्त वीकेंडलाच काम करणं पसंत करतात. लाक्रा म्हणाले की सहकारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संतुलन लक्षात घेऊन यापैकी एक पर्याय निवडतात. ते म्हणाले की, बहुतांश पार्ट टाईम कर्मचारी विद्यार्थी आणि महिला आहेत. त्यांची कारणे अशी असू शकतात की ते उर्वरित वेळ अभ्यास करत आहेत आणि काहीतरी वेगळे करत आहेत.

इतरत्र काम करू शकतो-

लाक्रा म्हणाल्या की आमच्या कराराच्या असाइनमेंट व्यतिरिक्त ते इतर कोणतेही काम करू शकतात. यासाठी ते मुक्त आहेत. तथापि, इतर कामामुळे त्यांच्या या कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आमच्या लक्षात आलं आहे की आमचे पार्ट-टाइमर, जेव्हा त्यांना दुसरं काही काम करायचं असेल, तर ते आमच्याकडे येतात आणि त्यांना कुठेतरी जाण्यापेक्षा जास्त तास आमच्यासोबत काम करू शकतात का ते विचारतात.

लाक्रा म्हणतात की भारतीय कर्मचार्‍यांमध्ये गिग आणि फ्रीलान्स कामाची स्वीकृती, विशेषत: कोविड महामारीनंतर वाढली आहे. सहकाऱ्यांबरोबरच व्यवसायासाठीही लवचिकता चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Job