मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुम्ही आणलेलं दूध भेसळयुक्त तर नाही? फक्त 30 सेकंदात असं ओळखा

तुम्ही आणलेलं दूध भेसळयुक्त तर नाही? फक्त 30 सेकंदात असं ओळखा

असं ओळखा भेसळयुक्त दूध

असं ओळखा भेसळयुक्त दूध

आपल्या रोजच्या जीवनात दूधाला खुप महत्त्वच असतं. दूधाशिवाय आपली सकाळ होत नाही. मात्र हेच दूध जर भेसळयुक्त येत असेल तर काय? हेच भेसळयुक्त दूध अगदी 30 सेकंदात कसं ओळखायचं हे आपण आज पाहणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 30 मार्च: आपली रोजची सुरुवात ही दूधाने होते. कुणाला चहा प्यायची सवय असतं, यामध्ये दूध लागतंच. तर दूध पिऊन दिवसाची सुरुवात करतो. लहानांपासून तर वृद्धापर्यंत हे महत्त्वाचं असतं. मात्र याच दुधामध्ये अनेकदा भेसळ पाहायला मिळते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या संशोधकांनी दुधाची शुद्धता तपासण्यासाठी एक अनोखं संशोधन केलंय. IIT मद्रासने त्रिमितीय पेपरवर आधारित पोर्टेबल डिव्हाइसचा शोध लावला आहे. जो 30 सेकंदात दुधातील भेसळ शोधू शकतो.

घरीच तपासता येईल भेसळयुक्त दूध

संशोधकांनी सांगितल्यानुसार, 'घरच्या घरी दूध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासता येऊ शकतं. हे डिव्हाईस दूधात युरिया, डिटर्जंट, साबण, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम-हायड्रोजन-कार्बोनेट, मीठ आणि दुधातील इतर भेसळ शोधू शकते. देशात भेसळयुक्त दुधाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.अशा परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांना या उपकरणामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.

कमी पैशात कार इन्शुरन्स हवंय ना? मग माहिती असायलाच हव्यात या 5 ट्रिक्स

दूध हे सर्वांसाठीच आरोग्यदायी मानलं जातं. यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. मात्र, दुधाच्या शुद्धतेबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न आहेत. कारण सध्याच्या काळात दुधातील भेसळ वाढली आहे. दिल्ली, मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये दूध मागणीपेक्षा कमी असतं. अशा वेळी लोक यामध्ये भेसळ करतात. दुधातील ही भेसळ सामान्य माणसाला ओळखता येत नसल्याने त्याच्या पौष्टिकतेवर विपरीत परिणाम होण्यासोबतच लोकांच्या आरोग्याशीही खेळ केला जातोय.

IIT मद्रासने लावला खास शोध

IIT मद्रासने 3D पेपरवर आधारित पोर्टेबल डिव्हाइसचा शोध लावलाय. जे केवळ 30 सेकंदात दुधात भेसळ शोधू शकते. ही टेस्ट तुम्ही घरीही करू शकता. येत्या काही दिवसांत सरकारच्या मान्यतेनंतर हे उपकरण सर्व लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. हे यंत्र दुधात युरिया, डिटर्जंट, साबण, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साईड यासह दुधात केलेल्या कोणत्याही प्रकारची भेसळ शोधू शकते.

सुकन्या अन् PPF योजनेवर मोठी अपडेट! सरकार नियमांमध्ये करणार 'हे' बदल

दुधातील भेसळ आता होईल कमी

गेल्या काही वर्षांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढलेय. खाद्यपदार्थ शुद्ध असला तरी खरेदी केल्यानंतरही भेसळ होण्याची भीती कायम असते. काही लोक बाजारातून दूध विकत घेतात आणि त्याचं सेवनही करतात. मात्र दूध शुद्ध असेलच याची खात्री कोणालाच देता येत नाही.

First published:
top videos