मागणी लक्षात घेऊन IIT सुरू करतेय 'हे' नवे अभ्यासक्रम

मागणी लक्षात घेऊन IIT सुरू करतेय 'हे' नवे अभ्यासक्रम

बाजारात मागणी कशाला आहे, यावरून हे कोर्सेस सुरू केले जातायत.

  • Share this:

मुंबई, 01 मे : आयआयटीसारखी संस्था आता विद्यार्थ्यांचं करियर आणि मागणी काय आहे हे पाहून नवे कोर्सेस लाँच करतंय. बाजारात मागणी कशाला आहे, यावरून हे  कोर्सेस सुरू केले जातायत. यात आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

एका रिपोर्टनुसार 2018मध्ये जवळजवळ 50 हजार डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग संबंधित जागा भरल्या गेल्या नाहीत. कारण कंपन्यांना योग्य उमेदवारच मिळाले नाहीत. तज्ज्ञांच्या मते भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्ससारखे प्रोफेशनल्स कमी आहेत. या क्षेत्रात नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.


22 वर्षांपासून 'अशी' गुंतवणूक केलीत तर 42व्या वर्षी मिळतील 5 कोटी रुपये


नोकरीतल्या या मागणीला लक्षात घेता आयआयटी नवे कोर्सेस सुरू करतेय.

यात आयआयटी हैदराबादमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये बीटेक कोर्स लाँच केला जातोय. नवा कोर्स जुन्या अभ्यासक्राच्या सेमिस्टरप्रमाणे असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्सचे 16 माॅड्युल्स असतील. याची फी जवळजवळ 2.65 लाख रुपये आहे. 4 मेपासून या अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल.


माओवाद्यांनी गडचिरोलीमध्ये का केला हल्ला?

परदेशात आधीच सुरू आहेत हे अभ्यासक्रम

भारतात हे अभ्यासक्रम आता सुरू होतायत. परदेशात ते आधीच सुरू होते. तिथे आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही कोर्सेस सुरू आहेत.आता आयआयटी खरगपूरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्टिफिकेट कोर्स लाँच केला जाणार आहे. हा 6 महिन्यांचा कोर्स आहे.


Spl Report:गडचिरोलीत निवडणूक सुरक्षित पार पडण्यासाठी पोलिसांनी केला 15 हजार किमीचा पायी प्रवास

आयआयटी कानपूरमध्येही सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेट कोर्सची सुरुवात होतेय. सायबर धोके वाढतायत. म्हणूनच या विषयात तज्ज्ञ निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केला गेलाय.

तसंच आयआयटी मद्रासही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आॅनलाइन कोर्स सुरू करतंय. फेब्रुवारीत लाँच झालेला हा कोर्स 4 महिन्यांचा आहे. यासाठी हुशार विद्यार्थी निवडले जातात. आयआयटी रोपडमध्येही कम्प्युटेशनल डेटा सायन्ससाठी बीटेक प्रोग्रॅम लाँच केला जातोय. गणित आणि कम्प्युटर सायन्स विभाग मिळून हा अभ्याक्रम सुरू करतंय.


VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: iit
First Published: May 1, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या