नवी दिल्ली, 7 डिसेंबर : तुम्ही पीएनबी बँकेचे (Punjab National Bank) ग्राहक असाल आणि तुमचं डेबिट कार्ड (Debit Card) हरवलं आहे का? किंवा कार्ड हरवलं तर काय? अशी भीती वाटत असेल, तर आता घाबरण्याचं कारण नाही. कारण आता पीएनबी बँकेने पीएनबी वन अॅप (PNB ONE) ही एक अभिनव सुविधा उपलब्ध केली आहे. ज्याद्वारे केवळ तीन स्टेप्स फॉलो करून नवीन डेबिट कार्डची सुविधा प्राप्त करता येणार आहे. तसंच या अॅपमुळे घरबसल्या बँकेची सर्व कामंही करता येणार आहेत.
पीएनबी बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. ग्राहकांचं डेबिट कार्ड हरवलं असलं, तर ते आता अगदी काही मिनिटांच्या अवधीत पुन्हा कार्ड मिळवू शकतात.
मोबाईलवर पीएनबी वन अॅप ओपन करा. डेबिट कार्ड ऑप्शन सिलेक्ट करून हॉटलिस्ट डेबिट कार्ड (Hotlist Debit Card) ऑप्शनवर क्लिक करा.
बँकेचे हे अॅप डाउनलोड करायचं असेल, तर या https://tinyurl.com/y56b93qs लिंकचा वापर करा.
पीएनबी वन काय आहे?
पीएनबी वन हे एक मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशन आहे. याच्या सहाय्याने बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष न जाता घरी बसून बँकेची सर्व कामं करता येतील. 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. याच्या सहायाने कधीही आणि कुठेही असला तरी बँकेच्या सेवा वापरता येतील.
सुरक्षितता -
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे अॅप उत्तम आहे. यात एमपीआयएनसह (MPIN) बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. यावरून कोणताही व्यवहार करताना पासवर्ड मागितला जातो. पासवर्डशिवाय कोणताही व्यवहार करता येत नाही.
पीएनबी वनची वैशिष्ट्ये -
- या अॅपच्या मदतीने ग्राहकांना टीडीएस, फॉर्म 16 भरता येतो.
- याच्या आधारे डुप्लिकेट चलन बनवता येते.
- पीएनबी वनमधून लॉग आऊट करताना फीडबॅकचा ऑप्शन दिसतो.
- ग्राहक आपल्या डेबिट कार्डचा पिन नंबर सेट करू शकतात.
- सुकन्या समृद्धी खातंही पीएनबी वन अॅपशी जोडता येतं, खात्यात पैसेही भरता येतात अशा अनेक सुविधा याद्वारे उपलब्ध आहेत.