Home /News /money /

तुमच्या कारचा इन्शोरन्स संपलाय का? लगेचच करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड

तुमच्या कारचा इन्शोरन्स संपलाय का? लगेचच करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड

जर एखाद्याने इन्शोरन्सची तारीख संपल्यानंतर मिळणाऱ्या 15 ते 30 दिवसांच्या ग्रेस पीरियडमध्येही इन्शोरन्स रिन्यू केला नाही, तर ग्राहकाला पुन्हा नवीन पॉलिसी घ्यावी लागते.

    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : तुमच्या गाडीचा इन्शोरन्स (Car insurance) संपला असेल आणि अजूनही तुम्ही तो रिन्यू केला नसेल, तर लवकरात लवकर रेन्यू करा. गाडीचा इन्शोरन्स रिन्यू न केल्यास, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. इंडियन मोटर लॉनुसार (Indian Motor Law), कार विना विमा पॉलिसी (Car Insurance Policy) चालवणं गुन्हा आहे आणि अशाप्रकारे गाडी चालवल्यास चालकाला दंड भरावा लागू शकतो. इन्शोरन्सची तारीख संपल्यानंतर कंपन्या 15 ते 30 दिवसांचा ग्रेस पीरियड देतात. त्याअंतर्गत पॉलिसीधारक विना कवरेज लॅपिंग प्रीमियम भरू शकतात. CNBC TV 18 शी बोलताना PolicyX चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फाउंडर नवल गोयल यांनी सांगितलं की, जर एखाद्याने इन्शोरन्सची तारीख संपल्यानंतर मिळणाऱ्या 15 ते 30 दिवसांच्या ग्रेस पीरियडमध्येही इन्शोरन्स रिन्यू केला नाही, तर ग्राहकाला पुन्हा नवीन पॉलिसी घ्यावी लागते. पॉलिसीबाजारचे मोटर इन्शोरन्स प्रमुख सज्जा प्रवीण चौधरी यांनी सांगितलं की, कंपनीकडून पॉलिसी एक्सपायरीचा मेसेज मिळतो. या मेसेजनंतर इन्शोरन्स रिन्यू करण्यासाठी पॉलिसी होल्डरने इन्शोरन्स करणाऱ्याशी संपर्क साधावा. इन्शोरन्स कंपनीला याबाबत सांगितल्यानंतर, वाहनाचा सर्व्हे करण्यासाठी अपॉईंटमेंट फिक्स केली जाते. सर्व्हेमध्ये कारला कोणतंही डॅमेज नाही ना याची तपासणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पेमेंट लिंक मिळते. या परिस्थितीत पॉलिसी रिन्यू होणार नाही - पॉलिसी रिन्यूवलवेळी सद्यस्थितीतील पॉलिसी रिन्यू करण्याव्यतीरिक्त, आवश्यकतांनुसार वर्धित कव्हरही दिला जाऊ शकतो. Alankit LTD चे मॅनेजिंग डायरेक्टर अंकित अग्रवाल यांनी सांगितलं की, आधीपासूनच डॅमेज असल्यास, कारची संपलेली पॉलिसी रिन्यू होऊ शकत नाही. विमा कंपनी वाहनाच्या नुकसानीत काही कपात करू शकतो. त्याशिवाय ग्राहक सध्याच्या विमा कंपनीवर समाधानी नसेल तर, ते विमा बदलू शकतात. वाढलेला कव्हर आणि उत्तम सेवा देणारी विमा कंपनी ग्राहकाने निवडावी, असं पॉलिसीबाजारचे मोटर इन्शोरन्स प्रमुख सज्जा प्रवीण चौधरी यांनी सांगितलं .
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Car, Money

    पुढील बातम्या