नवी दिल्ली, 24 जून : आजच्या काळात पॅनकार्डशिवाय (Pan card) कोणतीही महत्त्वाची आर्थिक कामं करणं शक्य नाही. बँक खातं उघडण्यासाठी, म्युच्युअल फंड्स, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी 50 हजारापेक्षा जास्त रकमेचे रोख व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक करणं (Link) सरकारनं अनिवार्य केलं असून यासाठी वारंवार सूचना दिल्या आहेत. आता हे काम करण्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकानं या मुदतीच्या आत पॅन-आधार लिंक करणं महत्त्वाचं आहे. या मुदतीअखेर तुमचं आधार आणि पॅनकार्ड जोडलं गेलं नाही, तर तुमचं पॅन कार्ड अवैध होईल आणि त्यामुळे तुमचे अनेक आर्थिक व्यवहार थांबू शकतात. तसंच अवैध पॅन कोठेही वापरल्यास मोठा दंडही भरावा लागू शकतो. याबाबत सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्डनं (CBDT) अत्यंत कठोर तरतुदी केल्या आहेत.
पॅन-आधार लिंक नसतील तर काय होईल?
- तुम्ही पॅन-आधार लिंक केलेलं नसेल, तर पॅनकार्ड निष्क्रिय (Inactive)होईल आणि त्याच वेळी तुमचं केवायसीही (KYC) अवैध (Invalid) होईल.
- अवैध पॅन वापरणं हा गुन्हा ठरेल, त्यासाठी तुम्हाला 1 हजार किंवा त्याहून अधिक दंड होऊ शकतो.
- तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Fund) पैसे गुंतवत असाल, तर पॅन अनिवार्य आहे. पॅन अवैध झालं, तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकणार नाही.
- तुम्ही बँकेत 50 हजारपेक्षा जास्त रक्कम भरून खातं उघडण्याचा प्रयत्न केलात किंवा खात्यातील 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल, तर त्यासाठी पॅन आवश्यक आहे.
- तुम्ही पाच लाखाहून अधिक किमतीचे दागिने (Jewellery) खरेदी करत असल्यास पॅनकार्डचे तपशील देणं अनिवार्य आहे. अवैध पॅन कार्डच्या आधारे तुम्ही मोठ्या किमतीचे दागदागिने खरेदी करू शकत नाही.
- तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं वाहन (Vehicle) खरेदी करत असाल, तर त्यासाठीही पॅनकार्डचा तपशील द्यावा लागतो. त्यामुळे पॅन आधारशी जोडलेलं नसेल, तर तुम्ही वाहन खरेदीही करू शकणार नाही.
Aadhar Card मध्ये अपडेट करण्यास समस्या येतेय? या नंबरवर करा तक्रार
दंड भरावा लागेल -
पॅन-आधार लिंक केलेलं नसेल, तर प्राप्तिकर कायद्यांतर्गत (Income Tax Law) कठोर कारवाई केली जाऊ शकते. अशा अवैध पॅनकार्डधारकांना नॉन-पॅन कार्डधारक मानलं जाईल. तसंच त्यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272 ब अंतर्गत 1000 रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचा दंड देखील होऊ शकतो.
वेबसाइटवरून पॅन-आधार लिंक करणं सहजसोपं -
प्राप्तिकर खात्याच्या वेबसाइटशिवाय, https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ या वेबसाइटसवरून देखील पॅन-आधार लिंक करता येते.
AC मध्ये 1 ते 5 स्टार रेटिंग काय असतं? एसी घेताना समजून घ्या हे गणित, होईल फायदा
एसएमएसद्वारेही पॅन आधार लिंक करता येतं -
एका एसएमएसच्या मदतीनेही पॅन-आधार लिंक करता येतात. 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. या एसएमएसमध्ये UIDAIPAN टाईप करून त्यापुढे आपला 12 अंकी आधार क्रमांक मग स्पेस देऊन 10 अंकी पॅन क्रमांक टाकावा. काही वेळातच तुमचं आधार आणि पॅन लिंक होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Pan card