Home /News /money /

या राज्यात नोकरी करायची असेल तर सोडावं लागेल सिगरेट आणि तंबाखू, अशी आहे अट

या राज्यात नोकरी करायची असेल तर सोडावं लागेल सिगरेट आणि तंबाखू, अशी आहे अट

भारतातील एका राज्याने एक वेगळा नियम बनवला आहे. तुम्हाला जर याठिकाणी सरकारी नोकरी करायची असेल तर उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करताना एक प्रतित्रापत्र द्यावे लागेल, ज्यामध्ये तंबाखूचं सेवन न करण्याबाबत लिहलेले असेल.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: झारखंड सरकारने (Jharkhand Government) सरकारी नोकरीसाठी एक अनोखी अट ठेवली आहे. राज्य सरकारने म्हटलं आहे की सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही किंवा भविष्यात ते या पदार्थांचं सेवन करणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून (1 April 2020) झारखंडमध्ये हा नवीन नियम लागू होणार आहे. हा नियम त्याच उमेदवारांसाठी असेल, जे झारखंड सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरीसाठी अर्ज करत आहेत. तंबाखूच्या दुकानात कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध होणार नाहीत गेल्या मंगळवारी रांची येथे झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. येथे चहा-बिस्किटांची विक्री होणार नाही, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालात झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचा हवाला देत असं म्हटलं आहे की यामध्ये सर्वांचं एकमत झालं पाहिजे. यामुळे नवीन पिढीला तंबाखूचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी मदत होईल. (हे वाचा-सर्वात श्रीमंत देशाकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती! भारत आहे या स्थानावर) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणचे राज्य नोडल अधिकारी एलआर पाठक यांच्या मते, समितीने हा नियम एप्रिल 2021 पासून लागू होईल असा निर्णय घेतला आहे. हे प्रतिज्ञापत्र झारखंड सरकारमध्ये नोकरी करू इच्छित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला द्यावं लागेल. ते केवळ कार्यालयातच नाही तर कार्यालयाबाहेरही तंबाखूशी संबंधित उत्पादनांचे सेवन करू शकणार नाहीत. (हे वाचा-तुमच्याकडे Rupay Card असल्यास मिळवा जबरदस्त ऑफर्स! शॉपिंगवर मिळेल कमाल Discount) भाजप नेते शिवपूजन पाठक यांनी राज्य सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केलं आहे. राज्य सरकारने दारू बंदीबाबत विचार करायला हवा, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे राज्याला नशामुक्त करण्यावरही काम करणं आवश्यक आहे.  यावर्षी एप्रिलमध्ये झारखंड सरकारने तंबाखूच्या सर्व प्रकारच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे हे स्पष्ट करा. यामध्ये सिगरेट, बिडी, पान मसाला, खैनी इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: बातम्या

    पुढील बातम्या