सावधान! तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका

तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक हजार किंवा लाख रुपये आले, तर हुरळून जाऊ नका. त्यानंतर तुम्हाला 'या' गोष्टी कराव्याच लागतील.

  • Share this:

समजा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कळलं की तुमच्या अकाऊंटमध्ये काही हजार किंवा लाख रुपये आलेत. तर काय होईल? कोणालाही नक्कीच आनंद होईल. पश्चिम बंगालमध्ये वर्धमान जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. तीन व्यक्तींच्या खात्यात कुणी तरी 25 हजार रुपये जमा केले होते. असं झालं तर तुम्ही अजिबातच ते पैसे वापरू नका. नाही तर संकटात सापडाल.

अगोदर जाणून घ्या हे पैसे कुठून आलेत ते. अनेकदा बँका असा घोटाळा करतात. फंड ट्रान्सफर करताना चुकीच्या अकाऊंट नंबरवर ट्रान्सफर होतं.

अशा पद्धतीनं तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल.

असं काही झालं तर पहिल्यांदा तुम्हाला बँकेला कळवावं लागेल. बऱ्याचदा लोक आलेले पैसे लपवून ठेवतात आणि खर्च करून टाकतात.

तुम्ही पैसे खर्च केलेत, तर तुम्ही संकटात सापडू शकता. कारण तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसे तुम्हाला परत करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला ठराविक वेळ दिला जातो. पण तसं नाही झालं तर पोलीस कारवाई होऊ शकते.

त्यामुळे अकाऊंटमध्ये पैसे आले तर खूश होऊ नका. त्याची चौकशी करा आणि ते परत करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या