Income Tax रिटर्न भरायची तारीख चुकवलीत तर काय होईल?

Income Tax Return, Nirmala Sitaraman - जुलै महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असतो. पण 31 जुलैपर्यंत तुम्ही नाही भरलात तर जाणून घ्या काय होईल ते

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 01:54 PM IST

Income Tax रिटर्न भरायची तारीख चुकवलीत तर काय होईल?

मुंबई, 17 जुलै : या महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सगळ्यांचीच धावपळ सुरू असते. 31 जुलै ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. समजा तुम्ही 31 जुलैच्या आत IT रिटर्न भरू शकला नाहीत तर तुमच्याकडे अजून एक संधी असते. त्या अवधीत तुम्ही रिटर्न भरून दंडापासून वाचू शकता.

फिस्कल इयर 2018-19साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2020. तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न फाइल करू शकला नाहीत तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटिस मिळू शकते. जरी तुम्ही 31 मार्च 2020पर्यंत रिटर्न फाइल करू शकत असलात तरी तो जुलैमध्येच करावा. तुम्ही 31 जुलै 2019नंतर आणि 31मार्च 2020च्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरलात तर तुम्हाला दंड बसू शकतो.

फक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज

किती पडेल दंड?

तुम्ही 31 जुलैनंतर 31 डिसेंबर 2019पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020पासून 30 मार्च 2020पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स सेक्शन 234F चा समावेश झाल्यावर लेट फाइन अनिवार्य झालीय. याआधी हे सर्व असेसिंग अधिकाऱ्यांवर अवलंबून असायचं. ते दंड लावतात की नाही ते.

Loading...

'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

छोट्या करदात्यांना किती दंड?

ज्यांची मिळकत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते 31 मार्च 2020च्या आधी रिटर्न फाइल करत असतील तर जास्तीत जास्त लेट फी 1000 रुपये लागेल.

ICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय!

एखाद्या करदात्याची पूर्ण मिळकत टॅक्स स्लॅब सवलतीमध्ये येत असेल आणि त्यानं उशिरा रिटर्न भरले तर त्याला कुठलाही कर लागत नाही.

समजा एखाद्याला परदेशातल्या संपत्तीतून मिळकत होत असेल आणि ती व्यक्ती कर सवलतीच्या सीमेत असेल तरीही रिटर्न फाइल केल्यावर कर लागू शकतो.

भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Jul 17, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...