मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पॅनकार्डबाबतचं 'हे' काम तातडीने करुन घ्या, अन्यथा भरावा लागू शकतो 10 हजारांचा दंड

पॅनकार्डबाबतचं 'हे' काम तातडीने करुन घ्या, अन्यथा भरावा लागू शकतो 10 हजारांचा दंड

 जर दोन PAN Card असतील तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय तुमचे बँक खातेही फ्रीज केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही वेळेत संबंधित विभागाकडे अधिकचं पॅनकार्ड जमा करा.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 नोव्हेंबर : सद्यस्थितीत पॅनकार्ड (PAN Card) महत्वपूर्ण दस्तावेज आहे. कोणतेही मोठे व्यवहार (Online Transaction) करताना पॅनकार्ड सोबत लागतंच. विना पॅनकार्ड कोणतेच व्यवहार शक्य होत नाहीत. त्यामुळे पॅनकार्ड आपल्यासाठी गरजेचं बनलं आहे. मात्र पॅनकार्डसंबंधी एक माहिती असणे आपल्या सर्वांना आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला 10 हजारांचा भुर्दंड बसू शकतो.

अनेकांकडे एकापेक्षा जास्त आधारकार्ड, पॅनकार्ड आहेत. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे पॅनकार्डबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास, एक पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करावे लागेल, अन्यथा त्या व्यक्तीस 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. बर्‍याच वेळा आपण एकदाच पॅनसाठी अर्ज करतो आणि जर आपल्याला आपले पॅनकार्ड मिळाले नाही तर आपण पुन्हा अर्ज करतो. अशा वेळी अनेक वेळा लोकांकडे 2 पॅन कार्ड असतात.

Gold Rate Today: 50000 रुपयांच्या जवळ पोहोचला सोन्याचा भाव, काय आहे चांदीचा दर?

तुमच्याकडेही जर दोन कार्ड असतील तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय तुमचे बँक खातेही फ्रीज केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही वेळेत संबंधित विभागाकडे अधिकचं पॅनकार्ड जमा करा. याशिवाय, प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 272B मध्ये दोन पॅन कार्ड ठेवल्यास 10,000 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

Go Fashion IPO:आजपासून कमाईची संधी!या आयपीओमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे का?

पॅन कार्ड कसं जमा करायचं?

>> सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

>>येथे तुम्हाला कॉमन फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

>> तुम्ही हा फॉर्म वेबसाइटवर जाऊन Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data लिंकवर क्लिक करुन डाउनलोड करू शकता.

>> मिळालेला फॉर्म भरुन तो कोणत्याही NSDL कार्यालयात सबमिट करा.

>>फॉर्म सबमिट करताना तुम्हाला दुसरे पॅन कार्ड देखील सबमिट करावे लागेल. ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाइनही करू शकता.

First published:

Tags: Finance, Online payments, Pan card