Home /News /money /

Budget 2020 : एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत? पाहा तुमचे किती पैसे सुरक्षित

Budget 2020 : एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत? पाहा तुमचे किती पैसे सुरक्षित

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार बँक दिवाळखोरीत गेल्यास 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. दिवाळखोरीत गेलेल्या बँकेमध्ये तुमचं एकापेक्षा जास्त खाती असतील, तर तुमचे नेमके किती पैसे सुरक्षित आहेत? वाचा सविस्तर

    नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : तुमचे पैसे एकापेक्षा अधिक बँकेत ठेवलेले आहेत. त्यातली एखादी बँक बुडाली. तर तुमच्या ठेवींचं काय होतं? दिवाळखोरीत निघालेल्या बँकेच्या खातेदारांना काही दिलासा मिळू शकणा का, याचं उत्तर शनिवारी जाहीर झालेल्या बजेटमधून मिळण्याची शक्यता होती. शनिवारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील दुसरं बजेट (Budget 2020) सादर करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यानी बजेट सादर केलं. यावेळी सीतारामन यांनी दिवाळखोरीत गेलेल्या बँकांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. दिवाळखोरीत केलेल्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या खात्यासाठी डिपॉझिट इन्शुरन्स (Bank Account Deposit Insurance) म्हणून 5 लाख रुपये देण्यात येतील. याआधी ही रक्कम 1 लाख इतकी होती. 1993 नंतर पहिल्यांदा 1 लाखाची मर्यादा वाढवून 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. मात्र अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर नागरिकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. जर एखाद्या ग्राहकाची एकापेक्षा जास्त खाती दिवाळखोरी जाहीर झालेल्या बँकेत असतील तर त्या सर्व खात्यांसाठी 5-5 लाखाची रक्कम मिळणार का? असा सवाल सामान्यांना पडला आहे. नेमका नियम काय आहे? DICGC कायदा, 1961च्या कलम 16(1) अंतर्गत एखादी बँक बुडाली तर DICGC ला (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) खातेदाराला भरपाई देणं अनिवार्य आहे. त्यासाठी 5 लाखापर्यंतचा विमा असणार आहे. तुमचं एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये खाती असतील तर या खात्यांमधील रक्कम आणि व्याज मिळून केवळ 5 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित असेल. 5 लाखांपेक्षा अधिकची रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही. म्हणजे जर दिवाळीखोरीत अडकलेल्या बँकेत तुमची रक्कम 8 लाखांपर्यंत असेल तर त्यातील तुमचे 5 लाखच सुरक्षित आहेत. त्यावरील रकमेची खात्री नाही. पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर खातेधारकांचा डिपॉझिट इन्शुरन्स वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. DICGCच्या अंतर्गत कोणत्या बँका येतात? DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) जवळ 31 मार्च 2019पर्यंत डिपॉझिट इन्शुरन्सची रक्कम 97 हजार 350 कोटी इतकी होती. ज्यामध्ये 87 हजार 890 कोटी रुपयांचा सरप्लस देखील आहे. DICGC ने 1962पासून सहकारी बँकांवर Claim Settlement साठी 5 हजार 120 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. DICGCच्या अंतर्गत एकूण 2 हजार 98 बँका येतात. ज्यामध्ये 1 हजार 941 सहकारी बँका आहेत. याच बँकांमध्ये कमी प्रमाणात Liquidation पाहायला मिळत आहे. 2019 या आर्थिक 12 हजार 40 रुपयांचा प्रीमियम मिळाला 2018-19 या आर्थिक वर्षात पब्लिक सेक्टर आणि व्यावसायिक बँकांकडून DICGCकडे 11 हजार 190 कोटी रुपयांचा डिपॉझिट इन्शुरन्स जमा झाला आहे. तर सहकारी बँकांकडून केवळ 850 कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण 12 हजार 40 रुपयांचा इन्शुरन्स प्रीमियम DICGCला मिळाला. व्यावसायिक बँकाच्या तुलनेत सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवणं लोकांना अधिक धोक्याचं वाटत आहे. अन्य बातम्या तुम्हाला किती कर द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम सुवर्णसंधी! भाव घसरल्याने सोनेखरेदीसाठी लगबग, सोमवारचे भाव इथे पाहा आर्थिक क्षेत्रात अच्छे दिन, मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच सर्वाधिक वाढ
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या