मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेत तुम्ही असा व्यवहार केला आहे का? मिळू शकते Income Tax विभागाची नोटीस

बँकेत तुम्ही असा व्यवहार केला आहे का? मिळू शकते Income Tax विभागाची नोटीस

आयकर विभागाकडून करचोरीची  (Tax Evasion) प्रकरणं किंवा बँक खात्याच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार (Suspected Transactions) केलेल्यांना नोटीस देखील लॉकडाऊन काळात पाठवण्यात आली नव्हती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर आयकर विभाग पुन्हा एका सक्रीय झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : कोरोनाचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. दरम्यान या काळात देशातील नागरिकांना काही आर्थिक सवलती देखील देण्यात आल्या होत्या. यामध्ये इनकम टॅक्‍स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत देखील वाढवली होती. इतर काही आवश्यक बाबींची डेडलाइन देखील वाढवली होती. त्याचप्रमाणे आयकर विभागाकडून करचोरीची  (Tax Evasion) प्रकरणं किंवा बँक खात्याच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार (Suspected Transactions) केलेल्यांना नोटीस देखील या काळात पाठवण्यात आली नव्हती. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आयकर विभाग पुन्हा एका सक्रीय झाला आहे. असे व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

आयकर विभागाने सप्टेंबर 2020 मध्ये कर चोरी प्रकरणात मोठ्या संख्येने अनेकांना समन (Summon) जारी केले आहेत. नोटबंदीवेळी बँक खात्यात मोठी रक्कम जमा (Heavy Deposits) करणाऱ्यांना शोधण्याचे आणि त्यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्याचे काम अद्याप सुरू आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती.  याअंतर्गत  1,000 आणि 500 च्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍स (CBDT) ने लॉकडाऊन दरम्यान लोकांना समन  पाठवणे थांबवले होते. मात्र आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ही सवलत हटवण्यात आली आहे.

(हे वाचा-लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यातून करा भरभक्कम कमाई, व्याजासह आता मिळेल अतिरिक्त सूट)

सीबीडीटीने  18 सप्टेंबर रोजी आयकर अधिकाऱ्यांना असे सांगितले की, ते संशयितांविरोधात कारवाई सुरू करू शकतात. यावेळी आयकर विभाग त्या प्रत्येक व्यक्तीला नोटीस पाठवेल ज्याच्या खात्यामध्ये नोटबंदीवेळी मोठी रक्कम जमा झाली आहे. आयकर विभागाच्या रडारवर असणाऱ्या सर्व नवीन लोकांना देखील नोटीस पाठवली जात आहे. ही नोटीस काही सस्‍पेक्‍टेड ट्रांझॅक्शन रिपोर्टच्या आधारावर पाठवली जात आहे.  आयकर कायदा कलम 148 च्या अंतर्गत 6 वर्षांच्या डेटामध्ये अनियमितता आढळल्यास ही नोटीस पाठवली जात आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! भारतीय कंपनीने जिंकली PepsiCo विरोधातील केस, 15 वर्ष सुरू होता खटला)

कोरोना व्हायरस संक्रमण होण्याआधी ज्या लोकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आली आहे, त्यांना नोटीस पाठवली जात आहे. संशयितांना नोटीसची सॉफ्ट कॉपी पाठवली जात आहे. इनकम टॅक्‍स बिजनेस अॅप्लिकेशन पोर्टल (ITBA Portal) मार्फत हे काम केले जात आहे. कोरोनाचे संकट पाहता करदात्यांना स्वत: विभाग कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूट दिली आहे. अर्थात कारवाई करता या करदात्यांना विभाग कार्यालयात स्वत: उपस्थित राहण्याची गरज नाही किंवा त्यांच्या ऐवजी कुणाला पाठवण्याची देखील आवश्यकता नाही. संबंधित व्यक्तींना इमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवली जात आहे.

First published:

Tags: Income tax, Money