मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Credit Card: सणासुदीच्या काळात ‘या’ 5 बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांची होणार चंगळ, स्वस्तात खरेदी करता येतील अनेक वस्तू

Credit Card: सणासुदीच्या काळात ‘या’ 5 बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांची होणार चंगळ, स्वस्तात खरेदी करता येतील अनेक वस्तू

Credit Card: सणासुदीच्या काळात ‘या’ 5 बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांची होणार चंगळ, स्वस्तात खरेदी करता येतील अनेक वस्तू

Credit Card: सणासुदीच्या काळात ‘या’ 5 बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांची होणार चंगळ, स्वस्तात खरेदी करता येतील अनेक वस्तू

Festive Sale 2022 : जर तुमच्याकडे ‘या’ 5 बँकांची क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही या सणासुदीच्या काळात अतिशय स्वस्त वस्तू खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून फेस्टिव सीजन 26 सप्टेंबरपासून अर्थात नवरात्रीपासून सुरू होणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 24 सप्टेंबर:  सध्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्यी संख्येत मोठी वाढ झाली आहे. विविध बँका ग्राहकांना क्रेडिट कार्डवर आकर्षक सूट देतात. त्यामुळं क्रेडिट कार्डचा वापर करून ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासोबतच जर तुमच्याकडे ‘या’ 5 बँकांची क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही या सणासुदीच्या काळात अतिशय स्वस्त वस्तू खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून फेस्टिव सीजन 26 सप्टेंबरपासून अर्थात नवरात्रीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळी आहे. या सणासुदीच्या काळात, अमेझॉन इंडिया ग्रेट इंडियन फेस्टिवल (Amazon India’s Great Indian Festival) आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज (Flipkart’s the Big Billion Days) 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. यामध्ये बर्‍याच ऑफर ICICI सारख्या कार्डधारकांसाठी आहेत. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, सिटी बँक, एसबीआय कार्ड आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर्स मिळतील. तथापि इतरही काही क्रेडिट कार्डे आहेत ज्यांच्या माध्यमातून खरेदी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर केल्यानं तुम्ही प्रत्येक वेळी खर्च करताना लक्षणीय रक्कम वाचवू शकता.

अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड-

जर तुम्ही अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून फ्लिपकार्ट तसेच मिंत्रावर खरेदी करत असाल तर तुम्हाला 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेस. तसेच क्लियरट्रिप, पीवीआर, उबर इत्यादींवर 4 टक्के कॅशबॅक आणि इतर सर्व श्रेणींवर 1.5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. कार्ड अॅक्टिव्ह केल्यावर 1,100 रुपयांचे स्वागत बोनसदेखील मिळतो. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 500 रुपये आहे.

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड-

एचडीएफसी मनीबॅक प्लस क्रेडिट कार्ड फ्लिपकार्ट, अमेझॉन, बिगबास्केट, रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोर आणि स्विगी वर 10 पट कॅशपॉइंट्स, EMI वर 5x कॅशपॉइंट्स ऑफर करते. लक्षात ठेवा की तुम्ही स्टेटमेंट क्रेडिट्स किंवा प्रवास किंवा कॅटलॉग आयटममध्ये लाभ मिळविण्यासाठी हे कॅशपॉइंट्स वापरू शकता. वापरकर्त्याला एका तिमाहीत 50,000 रुपये खर्च केल्यावर 500 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर देखील मिळतं. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 500 रुपये आहे.

हेही वाचा:Banking Jobs: बॅडन्यूज! सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवणं होणार अधिक कठीण, काय आहे कारण? वाचा सविस्तर

 स्टँडर्ड चार्टर्ड बँक क्रेडिट कार्ड-

स्टँडर्ड चार्टर्ड डिजिस्मार्ट क्रेडिट कार्ड कोणत्याही किमान खर्चाच्या अटीशिवाय Myntra वर 20 टक्के, ब्लिंकिट आणि Zomato वर 10 टक्के सूट देतं. देशांतर्गत विमान तिकीट बुक केल्यास ग्राहकांना 20 टक्के सूट मिळते. या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 588 रुपये आहे.

एचएसबीसी बँक क्रेडिट कार्ड-

 HSBC क्रेडिट कार्ड सर्व ऑनलाइन खर्चांवर 1.5 टक्के कॅशबॅक आणि इतर खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक देते. बँक वेलकम बेनिफिट म्हणून 500 रुपये किमतीचं Amazon व्हाउचर, रुपये 1,500 किमतीचं Myntra आणि 3,000 रुपये किमतीचं Ajio व्हाउचर जारी करतं. ग्राहकांना 100 रुपयांपर्यंत ब्लिंकिटवर फ्लॅट 10 टक्के सूट आणि फार्मसीद्वारे निर्धारित औषधं ऑर्डर केल्यावर 150 रुपयांपर्यंत फ्लॅट 10 टक्के सूट मिळते. या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड-

SBI क्रेडिट कार्ड सर्व ऑनलाइन खर्चांवर 5 टक्के कॅशबॅक आणि इतर सर्व खर्चांवर कोणत्याही निर्बंधांशिवाय 1 टक्के कॅशबॅक ऑफर करते. एका वर्षात 2 लाख रुपये खर्च केल्यास नूतनीकरण शुल्क माफ केलं जातं. या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 999 रुपये आहे.

क्रेडिट कार्ड वापरताना घ्या काळजी-

जर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड योग्य प्रकारं वापरलं तर तुम्हाला क्रेडिट कार्डवर महत्त्वपूर्ण व्याजमुक्त अवधी मिळतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदी करताना जास्त खर्च करण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून क्षमतेपेक्षा जास्त तुम्हाला लेट पेमेंट शुल्कासह दरवर्षी 28-49 टक्के इतकं मोठं व्याज भरावं लागेल.

First published:

Tags: Credit card