Home /News /money /

ही एक रुपयाची जुनी नोट तुमच्याकडे असेल तर होऊ शकता मालामाल; जाणून घ्या कसं?

ही एक रुपयाची जुनी नोट तुमच्याकडे असेल तर होऊ शकता मालामाल; जाणून घ्या कसं?

जगात असे अनेक लोकं आहेत. ज्यांना जुन्या नोटा किंवा नाणी जमा करण्याचा छंद असतो. त्यामुळे एखादी जुनी नोट विकत घेण्यासाठी ते लाखो-करोडो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात.

    मुंबई, 13 जून: जगात असे अनेक लोकं आहेत. ज्यांना जुन्या नोटा किंवा नाणी जमा करण्याचा छंद असतो. त्यामुळे एखादी जुनी नोट विकत घेण्यासाठी ते लाखो-करोडो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. नाण किंवा नोट जितकी जुनी असेल तेवढी त्याला जास्त किंमत मिळते. भारतातही अशा अनेक वेबसाइट्स आहेत, जिथे अशा नोटांची खरेदी विक्री केली जाते. संबंधित वेब साइट्सवर एक रुपयाच्या नाण्याला आणि नोटेला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे तुमच्याकडेही ती विशेष नोट असेल, तर तुम्ही एका क्षणात लखपती बनू शकता. ब्रिटीश काळात छापाई झालेल्या एक रुपयाच्या नोटेला सध्या इ कॉमर्स साइटवर चांगलीच मागणी आहे. पण ही नोट साधरणतः 1935 साली छापण्यात आली होती. या नोटवर किंग जॉर्ज (पाचवा) यांचा फोटो असून यावर जेडब्ल्यू यांनी स्वाक्षरी केली आहे. या एक रुपयाच्या नोटेसाठी अनेकजण जवळपास 40 हजार रुपये खर्च करण्यासाठी तयार आहेत. जर तुमच्याकडे अशा एकपेक्षा अधिक नोटा असतील, तर तुम्ही एका रात्रीत लखपती बनू शकता. त्याचबरोबर 1943  साली भारतीय रिझर्व्ह बँकेनं छापलेल्या दहा रुपयांच्या नोटेची मागणी वाढली आहे. या नोटेवर गव्हर्नर सीडी देशमुख यांची स्वाक्षरी असेल तर ही नोट विकत घेण्यासाठी लोकं जवळपास 50 हजार रुपये देण्यास तयार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे या दोन नोटा असतील, तर तुम्ही रात्रीत मालामाल होऊ शकता.  Ebay, कॉईनबाजार, इंडियन ओल्ड कॉईन आणि क्लिक इंडिया यासारख्या वेब साईट्सवर लोकं या नोटा आणि नाणी शोधत असतात. अशा नोटा आणि नाण्यांची बोली देखील लावली जाते. हे ही वाचा-50 पैशांचं नाणं विका आणि घरबसल्या कमवा 1 लाख रुपये अशी करा विक्री... क्लिक इंडिया वेब साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक येईल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करू शकता. यानंतर तुम्हाला फक्त तुमच्याजवळ असलेल्या नोटेचे फोटो याठिकाणी अपलोड करावे लागती. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. ज्यांना ती नोट हवी आहे, ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या