• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • कॅनरा बँकमध्ये अकाउंट आहे? मग आजच जवळच्या शाखेत जाऊन करा 'हे' काम; अन्यथा...

कॅनरा बँकमध्ये अकाउंट आहे? मग आजच जवळच्या शाखेत जाऊन करा 'हे' काम; अन्यथा...

असं न केल्यास तुमचं खातं इनॲक्टिव्ह होण्याचा धोका आहे.

 • Share this:
  जर तुम्ही गेल्या वर्षभरात कॅनरा बँकेत (Canara Bank) खातं उघडलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कॅनरा बँकेने जारी केलेल्या एका सूचनेनुसार तुम्हाला कदाचित आपल्या नजीकच्या शाखेमध्ये धाव घ्यावी लागणार आहे. असं न केल्यास तुमचं खातं इनॲक्टिव्ह (Canara Bank Account) होण्याचा धोका आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (Canara Bank twitter) बँकेने याबाबत माहिती दिली आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कित्येक बँकांप्रमाणे कॅनरा बँकही आपल्या ग्राहकांना बऱ्याचशा सुविधा ऑनलाईनच देते. मात्र, एक गोष्ट आहे, जी करण्यासाठी तुम्हाला स्वतःच बँकेत जावं लागणार आहे. ही गोष्ट आहे केवायसी (Canara Bank KYC Verification) व्हेरिफिकेशन. केवायसी म्हणजेच ‘नो युवर कस्टमर’ (KYC) व्हेरिफिकेशनवेळी तुम्हाला तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन बँकेत जावं लागणार आहे. बँकेचा असा नियमच आहे, की नवीन खातं उघडल्यानंतर एका वर्षाच्या आत केवायसी व्हेरिफिकेशन (Canara Bank Physical KYC verification) करुन घेणे आवश्यक आहे. असं न केल्यास तुमचं खातं इनॲक्टिव्हही केलं जाऊ शकतं. काय आहे YouTube Shorts?; यातून महिन्याला होऊ शकते लाखोंची कमाई! केवळ ऑफलाईनच होणार व्हेरिफिकेशन कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना केवळ बँकेत जाऊनच केवायसी व्हेरिफिकेशन (Canara Bank KYC verification offline) करता येणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, केवायसीमध्ये रहिवासी दाखला आणि ग्राहकाची ओळख पटण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. संपूर्ण केवायसी व्हेरिफिकेशन करुन घेण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड अशा कागदपत्रांची (Documents for KYC) आवश्यकता असते. तसेच, यातही आधार कार्ड वापरुन, किंवा विना आधार कार्ड असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. आधार कार्डचा वापर करुन केवायसी व्हेरिफिकेशन करणार असाल, तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन (Biometric Verification) करुन घेणे पुरेसे आहे. तसेच, आधार कार्डशिवाय केवायसी करणार असाल, तर वर नमूद केलेली कागदपत्रं वापरुन तुम्ही केवायसी व्हेरिफिकेशन करु शकता. जर एखाद्या ग्राहकाने हाफ केवायसी किंवा लिमिटेड केवायसी व्हेरिफिकेशन (Types of KYC) केलं, तर त्याचं खातं बंद होण्याची भीती असते. त्यामुळे बँकेच्या शाखेत (Canara Bank complete KYC) जाऊन संपूर्ण केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. केवायसीचेही वेगवेगळे प्रकार असतात. खात्याच्या प्रकारावर केवायसी अपडेशनचा कालावधी ठरवला जातो. काही खात्यांचे केवायसी दोन वर्षांनी अपडेट करावे लागते, तर काही खात्यांना हा कालावधी आठ वर्षांपर्यंतही जातो. पण या नंतरच्या गोष्टी झाल्या. सुरुवातीला एका वर्षाच्या आत फिजिकल केवायसी (Canara KYC Update) व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य असल्याचे कॅनरा बँकेने म्हटले आहे. त्यामुळे तुम्हीही कॅनरा बँकेत नव्याने खाते उघडले असेल, तर तातडीने नजीकच्या शाखेत जाऊन केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.
  First published: