श्रीमंत व्हा : 1 लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, दरमहा मिळवा हजारो रुपये

श्रीमंत व्हा : 1 लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, दरमहा मिळवा हजारो रुपये

तुमच्याकडे जर एक लाख रुपये असतील आणि तुमच्या शहरातच बिझनेस सुरू करायचा असेल तर सरकार तुम्हाला मदत करू शकतं. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवणुकीच्या जोरावर दर महिन्याला 15 हजार रुपये मिळवू शकता. सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत या बिझनेसचा प्रस्ताव आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : तुमच्याकडे जर एक लाख रुपये असतील आणि तुम्हाला तुमच्या शहरातच बिझनेस सुरू करायचा असेल तर सरकार तुम्हाला मदत करू शकतं. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवणुकीच्या जोरावर दर महिन्याला 15 हजार रुपये मिळवू शकता. सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत या बिझनेसचा प्रस्ताव आहे. यामध्ये कटलरीपासून, हँड टूल्स, शेतीची साधनं बनवली जातात. कटलरीला तर घराघरात चांगली मागणी असते. तुम्ही तुमच्या उत्पादनांचं मार्केटिंग केलंत तर हा बिझनेस आणखी वाढवता येऊ शकतो.

हा व्यवसाय सुरू करायला साडेतीन लाख रुपयांचा खर्च आहे. यामध्ये सरकार तुम्हाला 2 लाख 16 हजार रुपयांची मदत करेल.

धातूपासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठी मॅन्यफॅक्चरिंग युनिटचा खर्च 1 लाख 80 हजार रुपये आहे.

यामध्ये वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्रिंडर, बेंच, पॅनल बोर्ड आणि आणखी साधनं येतात.

कच्च्या मालावर खर्च : 1 लाख 20 हजार रु. (2 महिन्यांसाठी)

या कच्च्या मालावर दरमहा 40 हजार कटलरी, 20 हजार हँड टूल्स आणि 20 हजार शेतीची साधनं तयार होऊ शकतील.

कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च : दरमहा 30 हजार रु.

यामध्ये तुम्हाला एक लाख 14 हजार रुपयांचा खर्च असेल. बाकी सगळा खर्च सरकार करेल. सरकार एक लाख 26 हजार रुपयांचं टर्म लोन देईल आणि 90 हजार रुपयांचं वर्किंग कॅपिटल लोन देईल.

या व्यवसायात तुम्हाला सुमारे 15 हजार रुपयांचा नफा होईल. तुम्ही मार्केटिंग केलंत तर हा नफा आणखी वाढवू शकता.

या योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची असेल तर मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज भरू शकता. यासाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही.

================================================================================================================

SPECIAL REPORT: पुरग्रस्तांची घरं प्रकाशमय करण्यासाठी अहोरात्र धडपडणारा देवदूत

Published by: Arti Kulkarni
First published: August 20, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading