मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कर्जाचे हप्ते थकले असतील किंवा फेडता येत नसेल तर घाबरु नका, जाणून घ्या तुमचे अधिकार

कर्जाचे हप्ते थकले असतील किंवा फेडता येत नसेल तर घाबरु नका, जाणून घ्या तुमचे अधिकार

बँक किंवा रिकव्हरी एजंटकडून हप्ता भरण्यासाठी दबाव आणला जातो. यामुळं बरेच लोक घाबरतात किंवा डिप्रेशनचे शिकार होतात. जर आपलीही अशीच काहीशी परिस्थिती असेल आणि आपण हप्ते भरण्यास सक्षम नसाल तर घाबरून जाण्याची गरज नाही.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 06 जून : अनेकजण आपल्या घरासाठी किंवा कार खरेदी करण्यासाठी कर्ज (Bank Loan) घेतात. परंतु, काहीवेळा प्रतिकूल परिस्थितीमुळं आपण हप्ते भरू सकत नाही. त्यानंतर मग बँक किंवा रिकव्हरी एजंटकडून हप्ता भरण्यासाठी दबाव आणला जातो. यामुळं बरेच लोक घाबरतात किंवा डिप्रेशनचे शिकार होतात. जर आपलीही अशीच काहीशी परिस्थिती असेल आणि आपण हप्ते भरण्यास सक्षम नसाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपण कर्जासाठी एखादी वस्तू गहाण ठेवली असली तरी आपल्याला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. हे मात्र खरं आहे की, आपण कर्ज भरले नाही तर आपल्या मालमत्तेचा बँकेमार्फत लिलाव केला जावू शकतो किंवा कारवाई होते. सिक्युरिटीकरण आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज अंमलबजावणी कायद्यानुसार कर्ज देणारा व्यक्ती/संस्था तारण ठेवलेल्या मालमत्ता जप्त करू शकतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? की बँकांना देण्यात आलेल्या हक्कांबरोबरच तुम्हालाही काही हक्क मिळाले आहेत. जे बॅंकला कोणतीही कारवाई करण्यास प्रतिबंधित करतात. या अधिकारांमुळे, बँक आपल्याला धमकी देऊ शकत नाही किंवा आपले शारीरिक नुकसान करू शकत नाही. अशा परिस्थितीत, कर्ज घेतल्यानंतर आपल्याला कोणते-कोणते हक्क मिळतात, हे देखील आपल्याला माहीत असले पाहिजे आणि जर आपण कर्ज भरण्यास सक्षम नसाल तर आपण त्यांचा वापर करू शकता. तुम्हाला भरपूर वेळ दिला जातो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमांनुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला बराच वेळ दिला जातो. प्रथम, बँकेकडून आपल्याला बर्‍याच नोटीस बजावल्या जातात आणि कर्ज वसुली एजंट तुम्हाला कर्ज परत करण्यासाठी वेळही देईल. प्रथम आपल्याला अनेक नोटीसा बजावल्या जातात आणि नंतर आपली मालमत्ता विक्री करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर सार्वजनिक नोटीस दिली जाते. कोणीही धमकावू शकत नाही आपण कर्ज देण्यास सक्षम नसल्यास कोणताही बँक कर्मचारी आपल्याला धमकावू किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकत नाही. तसेच, आपल्याशी सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही. ते कदाचित काही तृतीय पक्षाच्या लोकांना वसुलीसाठी आपल्याकडे पाठवू शकतात, परंतु ते केवळ आपल्याला कर्ज परत करण्यास सांगू शकतात. तसेच हे लोक फक्त दिवसा आपल्याकडे येऊ शकतात आणि रात्री आपल्याकडे येऊ शकत नाहीत. मालमत्तेचे पूर्ण मूल्य मिळविण्याचा अधिकार जर आपली मालमत्ता विकली जात असेल तर आपल्याला मालमत्तेची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. असे नाही की बँका आपले पैसे परत मिळवण्यासाठी कमी किंमतीत आपली संपत्ती विकतात. यासाठी तुम्हाला मार्केट रेटनुसार प्रॉपर्टीची किंमत मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे जर तुमचे एकूण देणे 10 लाख आहे आणि तुमच्या गहाण ठेवलेल्या वस्तूची किंमत 20 लाख आहे तर ती विकल्यानंतर बँक केवळ 10 लाख आणि काही कर वजा करून उरलेले पैसे तुम्हाला परत करते.
First published:

Tags: Bank details, Home Loan, Loan, Personal banking

पुढील बातम्या