Akshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही? करू शकता हे काम

Akshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही? करू शकता हे काम

Akshaya Tritiya 2021: सोनं खरेदी (Buying Gold) करता न आल्याने तुमचं मन खट्टू होत असेल तर थांबा. लॉकडाऊन असतानाही अक्षय्यतृतीयेला काय करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे: भारतात सणांना अत्यंत महत्त्व आहे आणि ते साजरे करण्यात वेगळाच आनंद असतो. हे सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्याला सगळेच भारतीय प्राधान्य देतात. पण गेलं वर्ष आणि हे वर्ष या आनंदावर विरजण पडतंय. आता जवळ आलेला सण म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshyya Tritiya). येत्या 14 मेला अक्षय्य तृतीया आहे. पौराणिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर धनची देवता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमच्या घरात धनधान्य आणि समृद्धी वास करते.

या दिवशी केलेल्या दानाचं अक्षय्य स्वरूपात पुण्य मिळतं अशीही धारणा भारतीय संस्कृतीत (Indian Culture) आहे. पण आता लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणंच मुश्कील आहे तर तुम्ही घराबाहेर पडून सोनं कसं खरेदी करणार आणि लक्ष्मी मातेची कृपा कशी मिळवणार? त्यामुळे सोनं खरेदी (Buying Gold) करता न आल्याने तुमचं मन खट्टू होत असेल तर थांबा. लॉकडाऊन असतानाही अक्षय्यतृतीयेला काय करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अक्षय्य तृतीयेला हे खरेदी करा

अक्षय्य तृतीया या सणाच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करू शकणार नसाल तर तुम्ही बार्ली (Barly) खरेदी करा आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करा. विधीवत पूजा करा. त्यानंतर ही बार्ली लाल कापडात गुंडाळून तिजोरीत त्या ठिकाणी ठेवा जिथं तुम्ही पैसे आणि सोन्याचे चांदीचे दागदागिने ठेवता.

हे वाचा-Post Office योजनांमध्ये आहे गुंतवणूक? वाचा या सेवांसाठी किती द्यावे लागेल शुल्क

सोन्याच्या दानासारखंच आहे हे दान

पुराणातल्या मान्यतेनुसार बार्लीचं दान हे सोन्याच्या दानाइतकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे ज्योतिषाचा अभ्यास करणारे लोक ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसतं अशा व्यक्तींना बार्ली विकत घेऊन त्याचं दान करायला सांगतात. बार्लीच्या दानाला सोन्याच्या दानाइतकंच महत्त्वाचं मानलं जातं. लॉकडाउनच्या (Lockdown) काळात जर तुम्हाला सोनं खरेदी शक्य नसली तर तुम्ही बार्ली खरेदी करून त्याचं दान करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या गरीबाला बार्ली दान करू शकता.

हे वाचा-Gold Pric: 510 रुपयांनी महागलं सोनं, चांदीलाही झळाळी; हा आहे एक तोळा सोन्याचा दर

हे सगळ्यात शुभ दान

अक्षय्य तृतीयेला धान्याचं दान खूप शुभ मानलं जातं. अक्षय्य तृतीयेला कुठल्याही वस्तूचं दान केल्याने शुभफळ मिळतं असं मानलं जातं. असं म्हणतात की जे लोक कायद्यासंबंधी प्रश्नांमध्ये अडकलेले आहेत त्यांना बार्लीचं दान करायला हवं. अशा प्रकारे तुम्ही उपाय केले तर तुमच्याकडून लॉकडाउनचं उल्लंघनही होणार नाही आणि परंपराही पाळली जाईल.

First published: May 10, 2021, 7:29 AM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या