Work From Home कंटाळलात? मग आता करा Work From Hotel; आयआरसीटीसीकडून विशेष पॅकेज

Work From Home कंटाळलात? मग आता करा Work From Hotel; आयआरसीटीसीकडून विशेष पॅकेज

जर वर्क फ्रॉम होम करुन तुम्ही कंटाळला असाल तर आता ऑफिसचे काम निसर्गरम्य वातावरणात करु शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे: मागील एक वर्षापासून कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील लाखो कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करीत आहेत. काही दिग्गज कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. आता वर्षाहून अधिक काळापासून कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. कोरोनाचे संकट असल्याने घरी असलेल्या व्यक्तींवर घराबाहेर पडण्यासाठी निर्बंध आहेत. त्यामुळे ऑफिसचे काम संपल्यानंतरही घरातच वेळ घालवण्याशिवाय पर्याय नाही. या एकंदर स्थितीमुळे कंटाळवाणं वाटणं साहजीकच आहे.

त्यामुळे जर या परिस्थितीत तुम्हाला घराबाहेर पडून निसर्गरम्य वातावरणात, पर्यावरणासोबत काम करण्याची संधी मिळाली तर? तुमचे हे स्वप्न आयआरसीटीसी (IRCTC)पूर्ण करु शकते. जाणून घेऊया कसे ते...

जर वर्क फ्रॉम होम करुन तुम्ही कंटाळला असाल तर आता ऑफिसचे काम निसर्गरम्य वातावरणात करु शकता. IRCTCने अशा लोकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. आयआरसीटीसीने वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर वर्क फ्रॉम हॉटेल (Work From Hotel) ही संकल्पना आणली आहे.

वाचा: Go Air झालं आता Go First; अधिक स्वस्त विमानप्रवास आणि नाविन्याची हमी

असे आहे वर्क फ्रॉम हॉटेलचे पॅकेजेस

आयआरसीटीसीने वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर वर्क फ्रॉम हॉटेलचे पॅकेज सुरु केले आहे. या ऑफरनुसार तुम्ही तुमच्या आवडीच्या हॉटेलच्या रुममध्ये बसून अतिशय चांगल्या वातावरणात ऑफिसचे काम करु शकता. आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांसाठी हे पॅकेज एक चांगला पर्याय ठरु शकते.

10,126 रुपयांचे पॅकेज

या ऑफरमधील पॅकेजची सुरुवात 10,126 रुपयांपासून होते. या पॅकेजनुसार पाच रात्री एक रुममध्ये 3 व्यक्ती राहू शकतात. या पॅकेजमध्ये डिसइन्फेक्टेड रुम, 3 वेळचे जेवण, 2 वेळा चहा / कॉफी, वाय-फाय सुविधा, सुरक्षित कार पार्किंग आणि ट्रॅव्हल विम्याचा समावेश आहे. या पॅकेज व्यतरिक्त तुम्हाला कोणतीही वेगळी रक्कम मोजावी लागणार नाही.

वाचा: कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा, हे आहे कारण; पाहा लोनसाठीचे इतर पर्याय

या शहरांमध्ये मिळणार सुविधा

आयआरसीटीसीची ही सुविधा सध्या केरळमधील (Kerala) हॉटेल्समध्ये मिळत आहे. केरळमधील निसर्गरम्य परिसरात बसून तुम्ही ऑफिसची कामे हातावेगळी करु इच्छित असाल तर तुम्हाला त्यासाठी थोडी किंमत चुकवावी लागेल. आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, केरळमधील हॉटेल्समध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. केरळमधील मुन्नार, थेक्कडी, कुमारकोम, अलेप्पी, कोवलम, वायनाड आणि कोचीन या शहरांमधील हॉटेल्समध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या ऑफरनुसार, किमान 5 दिवसांचे पॅकेज तुम्हाला घ्यावे लागेल. नंतर गरजेनुसार पॅकेज तुम्ही वाढवून घेऊ शकता. पॅकेजचे बुकिंग आयआरसीटीसी वेबसाईट (IRCTC Website) किंवा आयआरसीटीसी टुरिझम मोबाईल अ‍ॅपवर करु शकते.

First published: May 15, 2021, 7:53 AM IST

ताज्या बातम्या