SBI ग्राहक असाल तर घरबसल्या मिळतील या सुविधा, जाणून घ्या फायदे

SBI ग्राहक असाल तर घरबसल्या मिळतील या सुविधा, जाणून घ्या फायदे

देशातील सगळ्यात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या सुविधा घेऊन येते. यातीलच एक सुविधा म्हणजे एसबीआय क्वीक अॅप (SBI Quick App).

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी :  देशातील सगळ्यात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या सुविधा घेऊन येते. यातीलच एक सुविधा म्हणजे एसबीआय क्वीक अॅप (SBI Quick App). या अॅपमध्ये देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमच्या अकाउंटमधील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकता. एसबीआय बँकिंग आणि मोबाइल सर्व्हिसच्या (Banking and Mobile Services) अंतर्गत ग्राहकांना बॅलन्स, मिनी स्टेटमेंट जशा सुविधांचा लाभ मिस्ड कॉल आणि SMS च्या माध्यमातून घेता येऊ शकतो. यासाठी ग्राहकांना रजिस्टर्ड नंबरचा वापर करावा लागेल.

(हेही वाचा-5 दिवसात 1500 रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या कधी कमी होणार दर)

बॅलन्स संदर्भात माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांना 9223766666 किंवा या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क करावा लागेल. काही सेकंदातच तुम्हाला SMS द्वारे माहिती पुरवण्यात येईल. त्याचप्रमाणे रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून ‘BAL’ असा मेसेज 09223766666 या क्रमांकावर पाठवल्यास बॅलेन्स संदर्भात माहिती मिळेल.

मिनी स्टेटमेंट कसं मिळवाल?

09223866666 या टोल फ्री क्रमांकावर ‘MSTMT’ असा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून पाठवल्यास तुम्हाला मिनी स्टेटमेंट मिळू शकेल. शेवटच्या 5 ट्रान्झॅक्शनची माहिती तुम्हाला या मिनी स्टेटमेंटमधून मिळू शकते. 09223866666 मिस्ड कॉल देऊनही तुम्ही मिनी स्टेटमेंट मिळवू शकता.

चेकबुकसाठी करू शकता अर्ज

एसबीआय बँकिंग आणि मोबाइल सर्व्हिसच्या माध्यमातून SBI चेकबुकसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ‘CHQREQ’ असा मेसेज 09223588888 या क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला एक SMS येईल ज्यात एक नंबर पाठवला जाईल. दोन तासांच्या आतमध्ये CHQACCY6 या मेसेजबरोबर बँकेकडून मिळालेला नंबर 09223588888 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

6 महिन्याचं बँक स्टेटमेंटही सहज मिळू शकतं

SBI ग्राहक 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट देखील सहज मिळवू शकतात. अर्ज केल्यानंतर रजिस्टर्ड मेलवर तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट PDF फाइलच्या स्वरूपात मेल करण्यात येईल. यासाठी ‘ESTMT <space> <Account Number> <space> <code> टाइप करुन तुम्हाला 09223588888वर SMS करावा लागेल. तुमच्या निवडीनुसार 4 डिजीट असणाऱ्या कोडच्या मदतीने ही PDF फाइल इनक्रिप्ट करता येईल.

या सेवांसाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया

एसबीआय बँकिंग आणि मोबाइल सर्व्हिसच्या अंतर्गतक सेवा मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. हे काम देखील तुम्ही मोबाइलच्या मदतीने करू शकता. याकरता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून ‘REG Account Number’ हा SMS 09223488888 वर पाठवावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 04:12 PM IST

ताज्या बातम्या