Home /News /money /

Credit Card: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरताय? फायदे आणि तोटे समजून घ्या

Credit Card: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरताय? फायदे आणि तोटे समजून घ्या

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा फायदा असा आहे की जर काही कारणास्तव तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकत नसाल, तर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता.

    मुंबई, 28 मे : एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड (Credit Card) योग्यरित्या मॅनेज केले नाही तर 2 क्रेडिट कार्ड्स असणे देखील तुम्हाला खूप महागात पडू शकते. पण दुसरीकडे, जर तुम्ही त्यांचा योग्य वापर करत असाल तर अनेक कार्डे असणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कसे ते जाणून घेऊया. एकहून अधिक क्रेडिट कार्डचे फायदे युटिलायझेशन रेशो / क्रेडिट स्कोअरमध्ये फायदा अधिक क्रेडिट कार्डचा फायदा असा आहे की वेळेवर पेमेंट केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) सुधारतो. तसेच, एकाच क्रेडिट कार्डवरील वापराचे प्रमाणही कमी आहे. जे क्रेडिट स्कोअर वाढवते. बॅलेन्स ट्रान्सफर सुविधा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा फायदा असा आहे की जर काही कारणास्तव तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकत नसाल, तर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आणखी एक सायकल (सुमारे एक महिना) मिळेल. RBI Rule: बँक FD करण्याआधी बदललेले नवे नियम समजून घ्या, नाहीतर घरबसल्या होईल मोठं नुकसान हाय लिमिटचा फायदा अधिक कार्ड्स तुम्हाला अधिक लिमिट (Credit Limit) देतात. अशा प्रकारे, ही क्रेडिट कार्डे आर्थिक संकटाच्या परिस्थितीत तुमची मदत करू शकतात. खरेदीच्या वेळी पर्याय ऑनलाइन खरेदीच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना विविध प्रकारचे फायदे दिले जातात. अशा परिस्थितीत अनेक बँका ऑफर देतात आणि अनेक बँकांचे कार्ड तुम्हाला या ऑफर देत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुमच्याकडे अधिक पर्याय तयार होतात. आर्थिक संकट कधीही येऊ शकतं, योग्य गुंतवणूक केल्यास अडचणीच्या काळात रडत बसावं लागणार नाही, कसं कराल प्लानिंग? एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचे तोटे जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचा खर्चही वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही आणखी कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तसेच त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही तितकाच वाईट परिणाम होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Credit card, Investment, Money

    पुढील बातम्या