मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ATM Cash Withdrawal Rules: ATM मध्ये पैसे नसल्यास इथे करा तक्रार

ATM Cash Withdrawal Rules: ATM मध्ये पैसे नसल्यास इथे करा तक्रार

एटीएममध्ये वेळेत पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेला 10000 रुपये दंड आकारला जाईल.

एटीएममध्ये वेळेत पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेला 10000 रुपये दंड आकारला जाईल.

एटीएममध्ये वेळेत पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेला 10000 रुपये दंड आकारला जाईल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांची सुविधा लक्षात घेता, नवा आदेश जारी केला आहे. या अंतर्गत  एटीएममध्ये (ATM) कॅश नसल्यास, RBI कडून बँकांना दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने कॅश उपलब्ध नसल्यास, ग्राहकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी हे पाउल उचललं आहे.

बँकांनी नियमाचं पालन न केल्यास या संदर्भात गांभिर्याने पाहिलं जाईल तसंच बँकांना दंडही आकारला जाईल, असं RBI ने म्हटलं आहे. एटीएममध्ये रोख रक्कम न टाकल्याबद्दल दंडाच्या योजनेत ही तरतूद करण्यात आली आहे. एटीएममध्ये वेळेत पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेला 10000 रुपये दंड आकारला जाईल.

एखाद्या बँकेच्या ATM मध्ये पैसे नसल्यास, ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर किंवा फेसबुक पेजवर तक्रार करू शकतात. त्याशिवाय 011 23711333 या क्रमांकावर फोन करुनही तक्रार करू शकतात. दरम्यान, देशभरात विविध बँकांचे जून 2021 पर्यंत 2,13,766 एटीएम होते.

RBI New Guidelines:बदलणार ऑनलाईन पेमेंट पद्धत,लक्षात ठेवावा लागेल 16 अंकी नंबर

ही सुविधा 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकेच्या ATM मध्ये कॅश नसल्यास बँकांना दंड भरावा लागू शकतो. एका महिन्यात 10 तासांपेक्षा जास्त एटीएममध्ये रोख रक्कम नसल्यास संबंधित बँकांना RBI कडून दंड केला जाईल.

केंद्राचा मोठा निर्णय! नोकरी गमावणाऱ्यांना 2022 पर्यंत मिळणार PF, वाचा सविस्तर

दरम्यान, फाटलेल्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नियमानुसार, नोटेच्या स्थितीच्या आधारावर तुम्हाला देशभरातील आरबीआय कार्यालयांमध्ये आणि नामांकित बँक शाखांमध्ये सदोष नोटा बदलल्या जाऊ शकतात.  जर फाटलेल्या नोटेचा सर्वात मोठा अविभाजित भाग एकूण नोटेच्या  80% पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला पूर्ण परतावा मिळेल. जर सर्वात मोठा तुकडा 40% क्षेत्रापेक्षा मोठा असेल, परंतु 80% पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला नोटचे फक्त अर्धे मुल्य मिळेल. जर सर्वात मोठा भाग 40% क्षेत्रापेक्षा लहान असेल तर तुम्हाला अजिबात रिफंड मिळणार नाही.

First published:

Tags: ATM, Rbi