मराठी बातम्या /बातम्या /मनी /विमाधारकांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनाग्रस्ताला रुग्णालय कॅशलेश सुविधा देत नसल्यास येथे करा तक्रार

विमाधारकांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनाग्रस्ताला रुग्णालय कॅशलेश सुविधा देत नसल्यास येथे करा तक्रार

 काही रिपोर्टनुसार, अनेक रुग्णालयं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीअंतर्गत कॅशलेश उपचार मिळवण्यास पात्र असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी कॅशलेश सुविधा देत नाहीत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत.

काही रिपोर्टनुसार, अनेक रुग्णालयं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीअंतर्गत कॅशलेश उपचार मिळवण्यास पात्र असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी कॅशलेश सुविधा देत नाहीत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत.

काही रिपोर्टनुसार, अनेक रुग्णालयं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीअंतर्गत कॅशलेश उपचार मिळवण्यास पात्र असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी कॅशलेश सुविधा देत नाहीत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत.

नवी दिल्ली, 29 एप्रिल : देशभरात कोरोनाचा कहर (Corona Cases in India) सुरू असताना, त्यावर उपचार घेणंही महाग ठरत आहे. अशात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीएआय (IRDAI) ने विमा कंपन्यांना कोरोना रुग्णांना कॅशलेश इलाजासाठी (Cashless Treatment) सुविधा देण्याचं सांगितलं आहे. याच दरम्यान काही रिपोर्टनुसार, अनेक रुग्णालयं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीअंतर्गत कॅशलेश उपचार मिळवण्यास पात्र असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी कॅशलेश सुविधा देत नाहीत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत. जर तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांसह असं काही होत असल्यास, याची तक्रार विमा कंपनी आणि विमा लोकपाल अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतात.

येथे करा तक्रार -

तक्रार करायची असल्यास, तक्रार नोंदणी फॉर्म IRDAI वेबसाईटवरुन (http://www.policyholder.gov.in/Report.aspx#) डाउनलोड करावा लागेल. या फॉर्ममध्ये तक्रारीचा तपशील भरुन, तक्रार IRDAI च्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन करता येईल.

अशाप्रकारे दाखल करता येईल तक्रार -

- IRDAI च्या कंज्यूमर रिड्रॅसल डिपार्टमेंटच्या टोल फ्री नंबर 155255 किंवा 1800 4254 732 वर कॉल करुन तक्रार दाखल करता येऊ शकते.

- आवश्यक कागदपत्रांसह Complaints@irdai.gov.in वर मेल करुन तक्रार करू शकता.

- IRDAI च्या पोर्टलवरुनही तक्रार दाखल करता येऊ शकते. यासाठी आपली तक्रार igms.irda.gov.in वर दाखल करुन मॉनिटर करू शकता.

- IRDAI ला तक्रार लिहूनही पाठवू शकता. त्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करुन प्रिंट काढावी लागेल. त्यानंतर फॉर्मसह आवश्यक कागदपत्रांसह हैदराबादच्या पत्त्यावर पोस्ट किंवा कुरियर करावं लागेल.

(वाचा - मोठा दिलासा! आता कोरोनावरील उपचारही होणार कॅशलेस, IRDAI ने विमा कंपन्यांना दिले आदेश)

रेफरेंस नंबर -

इरडा (IRDAI) किंवा विमा कंपनीकडे तक्रार दाखल केल्यानंतर लिखित पावती किंवा रेफरेंस नंबर घेणं आवश्यक आहे. याची पुढे आवश्यकता लागेल. याचद्वारे तुमच्या तक्रारीवर होत असलेल्या कारवाईबाबत माहिती मिळेल.

रुग्णालयावर होईल कारवाई -

विमाधारकाला ज्या विमा कंपनीला तक्रार करायची आहे, त्यासंबंधित कंपनीच्या तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा लागेल. तेथे विमाधारकाला तक्रार करावी लागेल. तक्रार दाखल केल्याच्या 15 दिवसांच्या आत जर विमा कंपनीने समाधानकारक पाउल उचललं नाही, तर विमाधारक, विमा कंपनीची तक्रार IRDAI कडे करू शकतो.

First published:

Tags: Coronavirus, Insurance