'ही' सरकारी बँक झाली खासगी, आता ग्राहकांना मिळणार बँकिंग आणि विमा सेवा एकाच ठिकाणी

'ही' सरकारी बँक झाली खासगी, आता ग्राहकांना मिळणार बँकिंग आणि विमा सेवा एकाच ठिकाणी

सरकारी बँकेचं रूपांतर खासगी बँकेत झाल्यानं आता बँकेत बरेच बदल होतायत.

  • Share this:

मुंबई, 05 मे : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक आयडीबीआय बँक आता सरकारी बनलीय. RBIनं नुकतंच एक पत्रक जाहीर केलंय. याप्रमाणे IDBI बँकेची कॅटेगरी बदललीय. आता ही बँक सरकारी राहिली नाहीय. ती खासगी झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार आता रिझर्व्ह बँक आॅफ इंडायानं एलआयसीला आयडीबीआय बँकेतला त्यांचा हिस्सा काढून घ्यायला वेळ दिलाय. तो आहे 12 वर्षांचा.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, आता द्यावी लागेल कमी किंमत

सरकारी बँक झाली खासगी - RBIनं प्रसिद्ध केलेल्या नव्या पत्रकात IDBIची कॅटेगिरी बदललीय. ही बँक आता खासगी झालीय. LICचा या बँकेत मालकी हक्क आहे. LICचं बँकेवर नियंत्रण असतं.

आता पुढे काय? - इंग्रजी वर्तमानपत्र ईटीमध्ये छापलेल्या बातमीनुसार रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं एलआयसीला आपला हिस्सा काढून घ्यायला बराच वेळ दिलाय.

अपत्याच्या नावे रोज करा 100 रुपयांची बचत, 15 वर्षांनी होईल 34 लाखांचा मालक

RBI नं भारतीय जीवन विमा निगमला 12 वर्ष दिलीयत. एलआयसीनं सांगितलं की बरीच वर्ष त्यांची बँकेत गुंतवणूक आहे. बँकेवर एलआयलीचं कर्जही आहे. म्हणून RBI नं एलआयसीला आपला हिस्सा 10 टक्के करण्यासाठी 12 वर्ष दिलेत.

देशातल्या दुसऱ्या मोठ्या सरकारी बँकेनं दिला ग्राहकांना झटका, EMI मध्ये झाली वाढ

IDBI बँकेनं सांगितलंय की, बँक आपल्या ग्राहकांना एका जागी बँकिंग आणि विमा अशी सेवा देईल.

IDBI कर्जात बुडाली होती. त्यावेळी एलआयसीला बँकेत 51 टक्के भागीदारी खरेदी करण्याची परवानगी मिळाली होती. 28 डिसेंबर 2018मध्ये एलआयसीनं आयडीबीआय बँकेत 14,500 कोटी रुपये टाकले होते. त्यानंतर 21 जानेवारी 2019 रोजी बँकेत 5,030 कोटी रुपये टाकले होते.

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

First published: May 5, 2019, 5:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading