Home /News /money /

Multibagger stock : टाटा ग्रुपच्या 'या' शेअरवर ICICI Securities ला विश्वास; Rakesh Jhunjhunwala यांचीही गुंतवणूक

Multibagger stock : टाटा ग्रुपच्या 'या' शेअरवर ICICI Securities ला विश्वास; Rakesh Jhunjhunwala यांचीही गुंतवणूक

टाटा ग्रुपच्या (Tata Group) टाटा मोटर्सच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी 1.11 टक्के आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजला विश्वास आहे की टाटा मोटर्ससाठी 2023 हे आर्थिक वर्ष खूप चांगले असणार आहे.

    मुंबई, 18 जानेवारी : ICICI Securities टाटा मोटर्सच्या स्टॉकबद्दल (Tata Motors share) खूप आशावादी आहे. कंपनी आगामी काळात चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे आणि तिचे शेअर्स तेजीत राहण्याची शक्यता आहे, असं ICICI सिक्युरिटीजला वाटतं. गेल्या एका वर्षात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 112 टक्के वाढ झाली आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्येही टाटा मोटर्सचा समावेश आहे. सप्टेंबर 2021 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, टाटा ग्रुपच्या (Tata Group) टाटा मोटर्सच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी 1.11 टक्के आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजला विश्वास आहे की टाटा मोटर्ससाठी 2023 हे आर्थिक वर्ष खूप चांगले असणार आहे. BUY रेटिंगसह 653 रुपयांचे टार्गेट टाटा मोटर्सच्या शेअरने शेअर बाजारात गेल्या 6 महिन्यांत 69 टक्के परतावा दिला आहे. लाइव्ह मिंटच्या एका बातमीनुसार, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने टाटा मोटर्सला बाय रेटिंग दिले आहे आणि 653 रुपये टार्गेट किंमत दिली आहे. ऑटो क्षेत्रात टाटा मोटर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या यादीत अव्वल आहे. या कंपन्यांच्या यादीत अशोक लेलँड (Ashok Layland) आणि TVS मोटर्सचाही (TVS Motors) समावेश आहे. EPFO : कोरोना संकटाना Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल? आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या नोंदीनुसार, टाटा मोटर्ससाठी येणारा काळ खूप चांगला असू शकतो. जग्वार लँड रोव्हरसाठी (Jaguar Land Rover) चिपचा पुरवठा सातत्याने सुधारत आहे. कच्च्या मालाचा पुरवठा आणि किमतीतही स्थिरता आहे. त्यामुळे कंपनीचे उत्पादन वाढत आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीलाही वेग आला आहे. यामुळे 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षांमध्ये फ्री कॅश फ्लोमध्ये वाढ होईल. जे कंपनीसाठी खूप फायदेशीर आहे. कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न लॉकडाऊन आणि चिपच्या कमतरतेमुळे नुकसान कोविड-19 मुळे लॉकडाऊन आणि चिपच्या तुटवड्यामुळे टाटा मोटर्सला मोठा फटका बसला होता. ICICI सिक्युरिटीजच्या नोंदीनुसार, 2024 मध्ये वाहन कर्ज 100 अब्ज रुपयांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीच्या भारतातील प्रवासी वाहनांची विक्री वाढत आहे. त्यामुळे कंपनीचा बाजारहिस्साही वाढत आहे. प्रवासी वाहन व्यवसायातून 350 अब्ज रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. EBITDA मार्जिन देखील 35 अब्ज रुपये असू शकते, जे स्टँडअलोन EBITDA च्या एक तृतीयांश आहे.
    First published:

    Tags: Investment, Share market, Tata group

    पुढील बातम्या