• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ICICI Securities चा 'या' दोन मिडकॅपमध्ये गुंतवणुकीचा सल्ला; 23 टक्के रिटर्नचा अंदाज

ICICI Securities चा 'या' दोन मिडकॅपमध्ये गुंतवणुकीचा सल्ला; 23 टक्के रिटर्नचा अंदाज

ब्रोकरेज फर्म ICICI Securities ने एक नोट जारी केली आहे ज्यामध्ये Nesco आणि East India Hotels सारख्या 2 मिडकॅप शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ICIC सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की पुढील 12 महिन्यांत या दोन शेअर्समध्ये 23 टक्क्यांची वाढ सहज दिसून येईल.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर : शेअर बाजारात आजच्या ट्रेडिंग सत्रात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक SENSEX 300 आणि NIFTY 100 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 314 अंकांनी घसरून 60,008 वर आणि निफ्टी 100 अंकांनी घसरून 17,898 वर बंद झाला. Banking Sector, Metal, Energy, Financial Services आणि Pharma Secotr मधील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. या सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे. AUTO, IT आणि Public Sector Banks च्या शेअर्समध्ये मात्र खरेदी दिसून आली. दरम्यान ब्रोकरेज फर्म ICICI Securities ने एक नोट जारी केली आहे ज्यामध्ये Nesco आणि East India Hotels सारख्या 2 मिडकॅप शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ICIC सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की पुढील 12 महिन्यांत या दोन शेअर्समध्ये 23 टक्क्यांची वाढ सहज दिसून येईल. वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित ICICI सिक्युरिटीजने ईस्ट इंडिया हॉटेल्सवर 180 रुपयांच्या टार्गेटसह BUY कॉल दिला आहे. सध्या हा शेअर 146 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कमाईत वाढ झाल्यामुळे कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. कंपनीच्या कमाईत वार्षिक आधारावर 233.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ती 201.6 कोटी रुपये झाली आहे. leisure category तील मागणी वाढल्याचा फायदा कंपनीला मिळत आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटाही कमी झाला असून तो 12.3 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचा नफा आणि मार्जिन चांगली वाढण्याची अपेक्षा आहे, त्या दृष्टीने या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर ICICI सिक्युरिटीजने Nesco या शेअरला BUY कॉल देताना त्यासाठी 770 रुपयांचे टार्गेट दिले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की पुढील 12 महिन्यांत या स्टॉकमध्ये 22 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या हा शेअर 630 रुपयांच्या पातळीवर दिसत आहे. ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कोविड-19 च्या वाढत्या लसीकरणामुळे आणि घटत्या केसेसमुळे, देशात अर्थव्यवस्था रिकव्हरी दिसून येत आहे. ज्यामुळे एग्जिबिशन बिजनेसमध्ये वाढ होईल, ज्यामुळे कंपनीला फायदा होईल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: