Home /News /money /

Multibagger Stock : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांना वर्षभरात तिप्पट परतावा, तज्ज्ञांच्या मते अजूनही गुंतवणुकीची संधी

Multibagger Stock : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांना वर्षभरात तिप्पट परतावा, तज्ज्ञांच्या मते अजूनही गुंतवणुकीची संधी

ब्रोकरेज गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या स्टॉकमध्ये आणखी वाढीची अपेक्षा करत आहेत, जो गेल्या एक वर्षापासून मल्टीबॅगर परतावा देत आहेत. सोमवारीही हा स्पेशल केमिकलचा स्टॉक पाच टक्क्यांनी वाढला.

    मुंबई, 17 मे: शेअर बाजारात (Share Market) अनेक मल्टिबॅगर शेअर्स (Multibagger Share) आहेत, ज्यांनी कमी वेळेत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहेत. असाच एक शेअर गुजरात फ्लोरोकेमिकल्सने (Gujarat Fluorochemicals Share) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ब्रोकरेज गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या स्टॉकमध्ये आणखी वाढीची अपेक्षा करत आहेत, जो गेल्या एक वर्षापासून मल्टीबॅगर परतावा देत आहेत. सोमवारीही हा स्पेशल केमिकलचा स्टॉक पाच टक्क्यांनी वाढला. कंपनी फ्लोरोपॉलिमर बनवते, ज्याचा वापर केबल उद्योग ते एरोस्पेस उद्योगात केला जातो. गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या स्टॉकने एका वर्षात 203 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने आपले बाय रेटिंग कायम ठेवत या मल्टीबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईज वाढवली आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की कंपनी 2023 आर्थिक वर्षात बॅटरी प्लांट सुरू करेल. कंपनीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये या प्लांटमधून महसूल मिळण्यास सुरुवात होईल. कंपनी आपल्या क्षमता विस्तारातही गुंतलेली आहे आणि त्यासाठी चांगले भांडवलही उभे करत आहे. ICICI बँकेकडून पुन्हा एकदा FD व्याजदरात वाढ; 20 बेसिक पॉईंटपर्यंत वाढ, तुम्हाला कसा होईल फायदा ICICI सिक्युरिटीजने टार्गेट वाढवलं आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, कंपनी आपल्या व्यवसायाच्या वाढीबाबत खूप आशावादी असल्याचे दिसून येते आहेे. कंपनी तिची उत्पादन क्षमता 13.2 केटीपीएपर्यंत वाढवण्यात गुंतलेली आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनी हे साध्य करेल अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की उत्पादनांच्या किमतीत आणखी वाढ झाल्याचा फायदा कंपनीला मिळेल. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 साठी आपले कॅपेक्स मार्गदर्शन 2.5 अब्जवरून 11.5 अब्ज केले आहे. हाय कॅपेक्सचा उद्देश फ्लोरोपॉलिमरची उत्पादन क्षमता वाढवणे आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने गुजरात फ्लोरोकेमिकल्स स्टॉकची खरेदी रेटिंग कायम ठेवत त्याची टार्गेट प्राईज वाढवली आहे. ब्रोकरेजने त्याची टार्गेट प्राईज 3400 रुपये ठेवली आहे. तरुणांनी करिअरच्या सुरुवातीलाच घर घरेदी करावं का? काय होईल फायदा? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या मल्टीबॅगर परतावा गुजरात फ्लोरोकेमिकल्सचा स्टॉक गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. सोमवारी, 16 मे रोजी या शेअरमध्येही तेजी आली आणि तो 5 टक्क्यांनी वाढून 2,495.15 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये शेअरने 7.74 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये 19.18 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात स्टॉक 203 टक्क्यांनी वाढला आहे. 17 मे 2021 रोजी हा स्टॉक 821.80 रुपयांवर बंद झाला. तर आज त्याची किंमत 2,495.15 रुपये झाली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या