Home /News /money /

ICICI Securities ला 'या' खासगी बँकेच्या शेअरमध्ये 40 टक्के रिटर्नची अपेक्षा, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

ICICI Securities ला 'या' खासगी बँकेच्या शेअरमध्ये 40 टक्के रिटर्नची अपेक्षा, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या रिसर्च रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँकेचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात आणि 1955 रुपयांच्या पातळीपर्यंत पोहचू शकतात.

    मुंबई, 12 मार्च : रशिया- युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि बाजारातील अस्थिरता असतानाही लिस्टेड कंपन्यांच्या मूलभूत गोष्टींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशा स्थितीत, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बाजारातील या घसरणीच्या दरम्यान पोजिशनल इनवेस्टर्स वॅल्यु स्टॉक निवडण्यात गुंतले आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी, ICICI Securities ने बँकिंग क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या रिसर्च रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँकेचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात आणि 1955 रुपयांच्या पातळीपर्यंत पोहचू शकतात. High Return Stock: शेअर बाजारात 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई, पाच दिवसात 40 टक्क्यांपर्यंत परतावा आयसीआयसीआय सिक्युरिटीचे म्हणणे आहे की सध्याच्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या दरम्यान एचडीएफसी बँक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे आणि सध्याच्या परिस्थितीच्या विश्लेषणावरून असा अंदाज आहे की या संकटामुळे रियल इकोनॉमिक ग्रोथवर 50 ते 100 बेस पॉइंट्सचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र क्रेडिट ग्रोथवर परिणाम जास्त वाईट होण्याची अपेक्षा नाही. ICICI सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये पुढे म्हटले आहे की, सध्याच्या भू-राजकीय तणावाचा बँकेच्या कर्ज आणि अॅडव्हान्स पोर्टफोलिओवर कोणताही परिणाम होणार नाही. याचे कारण असे की, संघर्ष करणाऱ्या देशांशी बँकेचा कोणताही संपर्क नाही, तसेच बँकेच्या कोणत्याही मोठ्या ग्राहकाला या संघर्षाचा फटका बसणार नाही. याशिवाय HDFC बँकेला प्रोजेक्ट फ्युचर रेडीच्या प्रभावी अंमलबजावणीचा लाभही मिळणार आहे. Share Market : शेअर बाजाराची चाल पुढील आठवड्यात कशी असेल? कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे HDFC बँक MSME आणि Ruler Banking, Digital Marketing सारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे. ज्याचा त्याला भविष्यात चांगला फायदा मिळण्याची आशा आहे. या तथ्यांवर आधारित, ICICI सिक्युरिटीजने HDFC बँक शेअरला बाय रेटिंग दिले आहे आणि टार्गेटमध्ये कोणताही बदल न करता ते 1955 रुपये कायम ठेवले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Hdfc bank, Money, Share market

    पुढील बातम्या