मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरमध्ये कमाईची संधी, ICICI Securities ची BUY रेटिंग

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरमध्ये कमाईची संधी, ICICI Securities ची BUY रेटिंग

कुबोटाने कंपनीतील स्टेक वाढवल्याच्या बातम्यांमुळे Escorts स्टॉकमध्ये अधिक तेजी आली आहे. ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की 2 महिन्यांत हा स्टॉक 2200 रुपयांची पातळी गाठू शकतो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 नोव्हेंबर : ICICI सिक्युरिटीज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) Escorts शेअरवर BUY रेटिंग कायम ठेवले आहे. ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कुबोटासोबत (Kubota) एक्सकॉर्ट्सच्या करारामुळे कुबोटा आता कंपनीचा को-प्रमोटर बनला आहे. या करारामुळे कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वाढ होईल आणि भारतातून जागतिक सोर्सिंगमध्येही वाढ होईल.

कुबोटाने कंपनीतील स्टेक वाढवल्याच्या बातम्यांमुळे या स्टॉकमध्ये अधिक तेजी आली आहे. ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की 2 महिन्यांत हा स्टॉक 2200 रुपयांची पातळी गाठू शकतो.

एस्कॉर्ट्सने अलीकडेच जाहीर केले की ते आपल्या जपानी पार्टनर कुबोटाला प्रीफरेंशियल अलॉटमेंटद्वारे 2000 रुपये प्रति शेअर दराने 93.64 लाख शेअर जारी करेल. त्यामुळे कंपनीला 1,873 कोटी रुपये मिळतील. एस्कॉर्ट्स ही भारतातील चौथी सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये त्याचा बाजार हिस्सा 11.3 टक्के होता. याशिवाय बांधकाम उपकरणे आणि रेल्वेशी संबंधित कामांमध्येही कंपनीचा सहभाग आहे. एस्कॉर्ट्सच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत 6 पट वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हा स्टॉक 300 रुपयांच्या आसपास होता.

Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का?

KUBOTA CORP LTD एस्कॉर्ट्समधील आपला हिस्सा वाढवेल. यानंतर एस्कॉर्ट्सचे नवीन नाव ESCORTS KUBOTA LTD असेल. कंपनीकडून KUBOTA CORP ला 1870 कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जातील. कुबोटा या कंपनीतील भागभांडवल रुपये 2,000 प्रति शेअर खरेदी करेल. याशिवाय KUBOTA देखील ओपन ऑफर आणणार आहे. नवीन नावामुळे कंपनीतील संचालक मंडळाची संख्या आता 15 वरून 18 होणार आहे.

SBI Fraud Alert: बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती कुणालाही सांगू नका; अन्यथा...

या सर्व बातम्यांमुळे शेअरमध्ये जबरदस्त उसळी आली आहे. बीएसईच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एस्कॉर्ट्समधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीतील हिस्सा 4.25 टक्के होता.

First published:

Tags: Money, Share market