• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Tata Group च्या 'या' शेअरवर ICICI Securities खरेदीचा सल्ला; तुमच्याकडे आहे का?

Tata Group च्या 'या' शेअरवर ICICI Securities खरेदीचा सल्ला; तुमच्याकडे आहे का?

ICICI सिक्युरिटीजने Indian Hotels वर 152 रुपयांच्या स्टॉप लॉससह 224 रुपयांचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट 3 महिन्यांत दिसून येऊ शकतं.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर : काही महिन्यांच्या सुस्तीनंतर हॉस्पिटॅलिटी (Hospitality) क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात इंडियन हॉटेल (Indian Hotel) दबावातून बाहेर पडताना दिसत आहे. ICICI Securities चे म्हणणे आहे की मजबूत व्हॉल्यूमच्या जोरावर हा स्टॉक मोठ्या कन्सॉलिडेशनमधून बाहेर येत आहे. हा एक प्रकारचा स्ट्रक्चरल टर्न अराउंड आहे. जो येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत तेजी चालू ठेवण्याचे संकेत देतो. ICICI सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, स्टॉक सध्या त्याच्या 50 Day EMA च्या वर ट्रेड करत आहे. ज्याने जून 2020 नंतर अनेकवेळा खरेदीच्या संधी दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन एन्ट्रीची संधी मिळत आहे. या स्टॉकचे रिस्क रिवॉर्ड रेशो देखील खूप चांगले दिसत आहे. इकॉनॉमी अनलॉक केल्याने, या स्टॉकमध्ये पुढे चांगली वाढ दिसून येईल. ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेलवर 152 च्या स्टॉप लॉससह 224 चे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट 3 महिन्यांत दिसून येऊ शकतं. इंडियन हॉटेलमध्ये 19,425 रुमची इन्वेन्ट्री आहे. हॉटेल उद्योगात त्याचा पोर्टफोलिओ खूप वैविध्यपूर्ण आहे. Taj, Vivanta, SeleQtions आणि Ginger हे त्याचे सुप्रसिद्ध ब्रँड आहेत. खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम कंपनीच्या बोर्डाने कर्ज कमी करण्यासाठी 4000 कोटी रुपयांच्या निधी उभारणीच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या कॅश फ्लो मध्येही सुधारणा झाली आहे. कंपनी तिच्या नॉन-कोअर अॅसेटच्या निर्गुंतवणुकीवर काम करत आहे. हे करण्यामागे कंपनीचे कर्ज कमी करणे हा हेतू आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, इंडियन हॉटेल्सच्या व्यवसायात चांगली सुधारणा झाली आहे. ICICI सिक्युरिटीजने या नोटमध्ये आशा व्यक्त केली आहे की कंपनीचा व्यवसाय प्री-कोविडच्या 97 टक्क्यांवर येईल. 14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर Indian Hotels मध्ये राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी इंडियन हॉटेलमध्ये राकेश झुनझुनवाला यांची देखील हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांची इंडियन हॉटेल्समध्ये 1.05 टक्के हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही कंपनीत 1.05 टक्के हिस्सेदारी आहे. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Pravin Wakchoure
  First published: