Home /News /money /

ICICI सिक्युरिटीज 'या' मल्टिबॅगर केमिकल स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला; काय आहे कारण?

ICICI सिक्युरिटीज 'या' मल्टिबॅगर केमिकल स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला; काय आहे कारण?

Gujarat Fluorochemicals या स्पेशालिटी केमिकल स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 142 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे, तर यावर्षी आतापर्यंत 289 टक्के परतावा दिला आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर : ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने मल्टीबॅगर स्टॉक गुजरात फ्लोरोकेमिकल्सला (Gujarat Fluorochemicals - GFL) BUY रेटिंग दिली आहे. ICICI Securities ला विश्वास आहे की फ्लोरोपॉलिमर्स (fluoropolymers) व्यवसायात त्याच्या मजबूत प्रवेशामुळे GFL चांगल्या स्थितीत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी, सौर पॅनेल आणि ग्रीन हायड्रोजनसाठी फ्लोरोपॉलिमरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे, ज्यामुळे कंपनीला फायदा होईल. गुजरात फ्लूरो या स्पेशालिटी केमिकल स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 142 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे, तर यावर्षी आतापर्यंत 289 टक्के परतावा दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजला या शेअर्समध्ये आणखी वाढ दिसत आहे. ICICI सिक्युरिटीजने कंपनीचा चांगला आऊटलूक लक्षात घेऊन 3,086 रुपयांचे टार्गेट देऊन कंपनीला बाय कॉल दिली आहे. Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की फ्लोरोपॉलिमर तयार करणारी GFL ही भारतातील एकमेव कंपनी आहे. याव्यतिरिक्त, ही चीनबाहेरील काही कंपन्यांपैकी एक आहे ज्यांच्याकडे फ्लोरोपॉलिमरचा मोठा पोर्टफोलिओ आहे. Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर ICICI सिक्युरिटीजने आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्पेशालिटी फ्लोरोपॉलिमर क्षेत्रात चिनी कंपन्यांचा ग्लोबल प्रेजेन्स मर्यादित आहे. यासोबतच युरोप आणि जपानमधील कंपन्याही या रसायनाचे उत्पादन वाढवण्यावर भर देत नाहीत. त्याच वेळी, GFL आपली उत्पादन क्षमता वाढविण्यावर तसेच पुरवठा साखळी सुधारण्यावर भर देत आहे, ज्यामुळे कंपनीला आणखी फायदा होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या