म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही उपयुक्त बातमी असू शकते. म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Fund Investment) गुंतवणूक करण्यात वास्तविक जोखीम असते, तरीही अलीकडच्या काळात त्या गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेलं एक वर्ष, दोन वर्षं आणि पाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या मल्टिअॅसेट कॅटेगरीने (Mutual Fund Multistate category) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यात सर्वांत जास्त परतावा ICICI प्रुडेन्शियल मल्टिअॅसेट फंडाने (ICICI Prudential Multi Asset Fund) दिला. त्या फंडाने एका वर्षात 64.8 टक्के, दोन वर्षांत 25.68 टक्के आणि पाच वर्षांत 14.95 टक्के परतावा दिला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (Bombay Stock Exchange) अर्थात सेन्सेक्स (Sensex) सध्या 61 हजारांच्या आसपास आहे. गेल्या चार दिवसांत त्यात बरेच चढ-उतार दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बाजार विश्लेषक आणि जाणकार सांगत आहेत, की अॅसेट अॅलोकेशनच्या बाबतीत गुंतवणूकदारांनी जागरूक राहिलं पाहिजे. त्यामुळे अशा परिस्थितीत मल्टिअॅसेट फंड्स (Multi Asset Funds) हा गुंतवणूकदारांसाठी (Investors) एक चांगला पर्याय ठरू शकतो.
तज्ज्ञ काय म्हणतात?
ब्रिजवॉटर असोसिएटचे संस्थापक आणि हेज फंड गुंतवणूकदार रे डालियो यांच्या म्हणण्यानुसार, अॅसेट अॅलोकेशनबद्दल तुमच्याकडे योग्य नियोजन पाहिजे. गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ संतुलित असला पाहिजे. वेगवेगळ्या वातावरणात चांगली कामगिरी करील, असा पोर्टफोलिओ हवा. याचाच अर्थ असा, की वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि वेगवेगळ्या शेअर्समध्ये पैशांची गुंतवणूक करायला हवी.
ICICI प्रुडेन्शियल मल्टिअॅसेट फंडाव्यतिरिक्त अॅक्सिसच्या ट्रिपल अॅडव्हांटेज फंडाने (Axis Triple Advantage Fund) एका वर्षात 41.26 टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्या फंडाने दोन वर्षांत 22.23 टक्के, तर पाच वर्षांत 13.34 टक्के परतावा दिला आहे. HDFC मल्टिअॅसेट फंडाने एका वर्षात 31.02 टक्के, दोन वर्षांत 21.01 टक्के आणि पाच वर्षांत 11.11 टक्के परतावा दिला आहे. SBI मल्टि अॅसेट फंडाने एका वर्षात 22.78 टक्के, दोन वर्षांत 14.88 टक्के आणि पाच वर्षांत 9.89 टक्के परतावा दिला आहे.
ASIAN PAINTS आणि BAJAJ FINANCE वर ब्रोकरेज हाऊसेसचं मत काय?
आकडे काय सांगतात?
UTI मल्टि अॅसेट फंडाने एका वर्षात 21.11 टक्के, दोन वर्षांत 14.10 टक्के आणि पाच वर्षांत 8.19 टक्के परतावा दिला आहे. सेबीच्या नियमांनुसार, मल्टि अॅसेट फंडाला कमीत कमी 10 टक्क्यांची गुंतवणूक तीन किंवा त्याहून जास्त अॅसेट क्लासमध्ये करावी लागते. ICICI प्रुडेन्शियलबद्दल बोलायचं झालं, तर तो फंड 10-80 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये, 10-35 टक्के गुंतवणूक डेटमध्ये, 10-35 टक्के गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये आणि 0-10 टक्के गुंतवणूक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट) आणि इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इनविट्स) यांमध्ये करतो.
मिक्स अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक केल्यामुळे या कॅटेगरीमध्ये फंड हाउस चांगली कामगिरी करू शकतात. मल्टिअॅसेट कॅटेगरी आणि अन्य फंड्सच्या तुलनेत ICICI प्रुडेन्शियलचा परतावा चांगला राहिला आहे.
गुंतवणूकदार झाले मालामाल
ICICI प्रुडेन्शियलचा मल्टिअॅसेट फंड ऑक्टोबर 2002मध्ये सुरू करण्यात आला होता. आता त्याची नेट अॅसेट्स व्हॅल्यू म्हणजेच NAV तब्बल 39 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचा अर्थ असा, की 19 वर्षांपूर्वी 10 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज 390 रुपये झाले असते. समजा कोणी SIPच्या माध्यमातून दर महिन्याला यात 10 हजार रुपये गुंतवले असते, तर आतापर्यंत गुंतवणुकीची रक्कम 22.8 लाख रुपये एवढी झाली असती; मात्र त्या रकमेचं मूल्य आज 1.57 कोटी रुपये एवढं झालं असतं.
डिसेंबर 2021पर्यंत ICICI प्रुडेन्शियल स्कीमने 63.6 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये केली. त्या पोर्टफोलिओच्या टॉप 4 क्षेत्रांमध्ये ऑटो, पॉवर, टेलिकॉम आणि मेटल्स यांचा समावेश आहे. शेअर बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीत ही स्कीम इक्विटीमध्ये 10-80 टक्के गुंतवणूक करते. सर्वसाधारण स्थिती ती 65-75 टक्क्यांपर्यंत केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment