मंदीत संधी! कोरोना काळात या फंडमुळे होऊ शकता मालामाल

मंदीत संधी! कोरोना काळात या फंडमुळे होऊ शकता मालामाल

कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, पण हेल्थकेयर सेक्टरला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडाने (ICICI Prudential Mutual Fund) या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हेल्थ केअर ईटीएफ (Healthcare ETF) सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, पण हेल्थकेयर सेक्टरला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडाने (ICICI Prudential Mutual Fund) या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हेल्थ केअर ईटीएफ (Healthcare ETF) सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडाच्या हेल्थकेअर ईटीएफची नवी फंड ऑफर (New Fund Offer) 6 मे 2021 ला खुली होणार आहे. ही ऑफर 14 मे 2021 ला संपणार आहे. ही योजना म्हणजे हेल्थकेअर इंडेक्सवर नजर ठेवणारी एक ओपन एंडेड एक्सचेंज ट्रेडेड फंड योजना आहे. यात आरोग्य क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांना एक्सपोजर मिळतं.

NFO मध्ये करू शकता कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक

कंपनीनी दिलेल्या माहितीनुसार NFO मध्ये कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. आपल्या बेंचमार्क निफ्टी हेल्थकेअर टीआरआय इंडेक्सने प्रदान केलेल्या रिटर्नच्या समान पटीत ग्राहकांना फायदा मिळवून देण्याचं या योजनेचं ध्येय आहे. फंडाला NSE आणि BSE दोन्ही एक्सचेंजमध्ये लिस्ट केलं जाईल, या फंडाचे युनिट्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतील.

आरोग्य क्षेत्रातला नफा वाढण्याची शक्यता

या उत्पादनाच्या लाँचबद्दल ICICI प्रूडेंशियल एएमसीचे एमडी व सीईओ निमेश शाह म्हणाले, 'कोरोना महामारी, वाढत्या आरोग्याच्या अडचणी आणि जीवनशैलीतील बदलांमुळे येत्या 10 वर्षांत आरोग्य क्षेत्रात चांगल्याप्रमाणात वाढ होईल आणि त्यामुळे नफाही वाढेल. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता चांगल्या आरोग्य सुविधांची गरज कायमच भासत राहणार आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.'

वेगाने विकसित होणाऱ्या हेल्थकेअर कंपन्यांचा निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, डिवाईज लॅबोरेटरीज, सिप्ला आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज या कंपन्या इंडेक्सच्या सर्वोच्च पाच कंपन्या आहेत.

NFOकाय असतो?

NFO म्हणजे न्यू फंड ऑफर (New Fund Offer). एखाद्या असेट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने सुरू केलेल्या नव्या स्कीमला NFO म्हणतात. ही कंपनी एएमसी शेअर आणि सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा करते आणि त्यावर लोकांनाच चांगला नफा देऊन त्यांच्या गुंतवणुकीत भर घालते.

सध्या आरोग्य क्षेत्रातील कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत त्यामुळे त्या भविष्यात प्रचंड मोठ्या होणार आहेत. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

First published: May 3, 2021, 11:44 PM IST

ताज्या बातम्या