Home /News /money /

ICICI Bank ग्राहकांना खुशखबर; FD वरील व्याजदरात वाढ, नवे दर चेक करा

ICICI Bank ग्राहकांना खुशखबर; FD वरील व्याजदरात वाढ, नवे दर चेक करा

ज्या ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) एफडी केली आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. नवीन दर 10 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत.

    मुंबई, 13 मार्च : महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) मोठी भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवर (Fixed Deposit) व्याजदरात बदल केला आहे. ज्या ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेत एफडी केली आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. नवीन दर 10 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार, ICICI बँकेच्या या निर्णयाचा फायदा त्या ग्राहकांना होईल ज्यांनी 3 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ FD केली आहे. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 4.6 टक्के व्याज मिळेल. यासाठी 3-10 वर्षे कालावधी आहे. जर कालावधी 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी असेल तर ग्राहकांना 4.50 टक्के व्याज मिळेल. विना हॉलमार्क Gold दागिन्यांची अशी करा शुद्धता तपासणी, पाहा किती द्यावं लागेल शुल्क कोणत्या कार्यकाळासाठी FD वर किती व्याज आहे ते जाणून घ्या? >> बँकेने म्हटले आहे की 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सर्व दर लागू आहेत. >> या बदलानुसार, ग्राहकाला 15 महिने किंवा त्याहून अधिक आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.2 टक्के व्याज मिळेल. >> 18 महिने किंवा त्याहून अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी FD वर 4.3 टक्के व्याज असेल. >> एक वर्ष ते 15 महिन्यांसाठी FD करणाऱ्या ग्राहकाला 4.15 टक्के व्याज मिळू शकते. >> एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर बँक 2.5 टक्क्यांवरून 3.7 टक्के व्याज देत आहे. UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय या दरांमध्ये कोणताही बदल नाही ICICI बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही. नवीन आणि जुने दर लागू आहेत. म्हणजे बँकेच्या ग्राहकांना पूर्वी जेवढे व्याज मिळायचे तेच व्याज मिळणार आहे. यापूर्वी, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने देखील अलीकडेच FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Fixed Deposit, Icici bank, Investment

    पुढील बातम्या