• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! आजपासून या सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! आजपासून या सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क

ICICI Bank service charges to change from 1 August 2021: तुम्ही जर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जाणून घ्या कोणत्या नियमात बदल होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेमध्ये (ICICI Bank) तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या खाजगी बँकेत आजपासून (1 ऑगस्ट 2021) काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. 1 ऑगस्टपासून एटीएममधून (ATM Interchange Charges) पैसे काढणं देखील महागणार आहे. ICICI बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा देते. तुम्ही यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करून पैसे काढले तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे. याशिवाय चेकबुक शुल्कासंदर्भातही (Chequebook charges) काही बदल होणार आहेत. जाणून घ्या किती शुल्क द्यावे लागेल आणि आणखी कोणते बदल बँकेत होणार आहेत. 1. एक ऑगस्टपासून होणार हे बदल >> ऑगस्ट महिन्यापासून ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमधून दरमहा 1 लाख रुपये काढता येतील >>  त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. >> होम ब्रँच नसणाऱ्या शाखेमध्ये प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही आहे >>त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे वाचा-अर्थ मंत्रालय दरमहा देतंय 1.30 लाख रोखरक्कम? वाचा सविस्तर 2. चेकबुकवर द्यावं लागेल इतकं शुल्क >> तुम्हाला वर्षाला 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. >> यानंतर अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानं द्यावे लागतील. हे वाचा-LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस सिलेंडर, तपासा लेटेस्ट द 3. ATM इंटरचेंज ट्रान्झॅक्शन >>बँकेच्या वेबसाइटनुसार, एटीएम इंटरचेंज ट्रान्झॅक्शनवर देखील शुल्क आकारले जाईळ. >> 6 मेट्रो लोकेशन्सवर एका महिन्यात पहिले तीन ट्रान्झॅक्शन फ्री असतील. >> एक महिन्यासाठी इतर ठिकाणी पहिले पाच ट्रान्झॅक्शन मोफत असतील. >>यानंतर 20 रुपये प्रति आर्थिक व्यवहार आणि 8.50 रुपये प्रति गैर-आर्थिक व्यवहार शुल्क द्यावे लागेल
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: