'या' बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या सोईसाठी व्हॉइस बँकिंग सर्व्हिसची सुरूवात

'या' बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या सोईसाठी व्हॉइस बँकिंग सर्व्हिसची सुरूवात

आयसीआयसीआय (ICICI) बँकेने सुद्धा ग्राहकांच्या सोयीसाठी व्यवस्थेमध्ये काही बदल केले आहेत. बँकेच्या नवीन सुविधेअंतर्गत ग्राहक अगदी सोयीस्कररित्या बँकेची कामे करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जायला लागू नये याकरता देशातील विविध बँका अनेक सेवा-सुविधा घेऊन येत आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेने सुद्धा ग्राहकांच्या सोयीसाठी व्यवस्थेमध्ये काही बदल केले आहेत. दरम्यान त्यांनी नुकतीच सुरू केलेली योजना कदाचित आणखी कोणाकडेही नाही आहे. या सुविधेअंतर्गत आयसीआयसीआयचे ग्राहक अगदी सोयीस्कररित्या बँकेची कामे करू शकतात.

(हे वाचा-टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्यातील स्टार्टअप देतंय घरपोच इंधन)

आयसीआयसीआयने जगभरात प्रसिद्ध असणारे व्हॉईस असिस्टंट Amazon Alexa आणि Google Assistant यांच्याबरोबर AI संचालित मल्टी-चॅनल चॅटबॉट 'iPal' लाँच केला आहे. या चॅटबॉटच्या मदतीने ग्राहकांची बँकिंगमधील कामं सोपी करण्याचा ICICI चा मानस आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जणांना बँंकेपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे, यावर उपाय म्हणून ही योजना सुरु केल्याचे आयसीआयसीआयकडून सांगण्यात आले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार असून याकरता बँकेचे अ‍ॅप वापरावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात सुरू केली होती व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सर्व्हिस

ICICI ने गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सर्व्हिस सुरू केली होती. ज्याअंतर्गत ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरच सेव्हिंग अकाउंट बॅलेन्स (Savings Account Balance), शेवटचे तीन टान्झॅक्शन, क्रेडिट कार्ड लिमीट त्याचप्रमाणे प्री अप्रुव्ह्ड लोन इ. बाबींची माहिती मिळू शकते. तसंच व्हॉट्सअ‍ॅपवरच ग्राहक त्याचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील ब्लॉक किंवा अनब्लॉक करू शकतात.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 20, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या