मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमचं या बँकेत Loan आहे का? भरावा लागणार जास्त EMI

तुमचं या बँकेत Loan आहे का? भरावा लागणार जास्त EMI

 बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या निर्णयानंतर एमसीएलआरवर आधारित सर्व कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.

बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या निर्णयानंतर एमसीएलआरवर आधारित सर्व कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.

बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या निर्णयानंतर एमसीएलआरवर आधारित सर्व कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : तुम्ही जर लोन काढलं असेल किंवा EMI भरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. आधीच RBI ने ऑक्टोबर महिन्यात 0.50 टक्के व्याजदर वाढवल्याने EMI वाढले आहेत. जे लोन घेणार आहेत त्यांना जास्ती व्याजदराने लोन फेडावं लागणार आहे.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 1 डिसेंबरपासून एमसीएलआरवर आधारित सर्व व्याजदर महाग झाले आहेत. बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या निर्णयानंतर एमसीएलआरवर आधारित सर्व कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.

Personal loan घेण्यापेक्षा 'हे' पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी

MCLR वाढवण्यात आलं

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे दर 8.05 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाले आहेत. एक महिन्याचे दर 8.05 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाले आहेत.

तीन महिन्यांचे दर 8.10 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाले आहेत. सहा महिन्यांचे नवे दर 8.35 टक्के, एका वर्षाचे नवे दर 8.40 टक्के झाले आहेत.

मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

याआधी PNB Bank ने वाढवलं लोन

सरकारी बँक PNB ने देखील 0.05 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली आहे. एका रात्रीत 7.40 टक्क्यांवरून 7.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. एका महिन्यात 7.45 टक्के व्याजदर वाढून आता 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.

तीन महिन्यांचे दर 7.55 टक्क्यांवरून 7.60 टक्के झाले आहेत. सहा महिन्यांचे नवे दर 7.80 टक्के, एका वर्षासाठी नवे दर 8.10 टक्के आहेत.

बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरचे दर वाढवले

लग्नासाठी दागिने खरेदी करायला लोनची गरज आहे? कसं घेता येतं लोन

बँक ऑफ इंडियानेही दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. एमसीएलआरच्या दरात 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे. रात्रीचे दर 7.05 टक्क्यांवरून 7.30 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एक महिन्याचे दर 7.40 टक्क्यांवरून 7.65 टक्के झाले आहेत. तीन महिन्यांचे दर 7.45 टक्क्यांवरून 7.70 टक्क्यांवर पोहोचले आहेत. सहा महिन्यांचे नवे दर 7.90 टक्के, एका वर्षासाठी नवे दर 8.15टक्के आहेत.

First published: