• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • EDचा दणका! ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांच्या पतीला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक

EDचा दणका! ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांच्या पतीला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक

चंदा कोचर यांच्यावर आपल्या पतीला फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.

 • Share this:
  मुंबई 07 सप्टेंबर: आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ED ने अखेर अटक केली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळवून दिला असा त्यांच्यावर आरोप आहे. चंदा कोचर आणि त्यांच्या पती विरोधात PMLA नुसार ED ने गुन्हा नोंदवला होता. कोचर यांनी अवैध मार्गाने व्हिडिओकॉनला 1875 कोटीचं कर्ज मंजूर केलं होतं. आज दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ही अटक करण्यात आली. 2012 मध्ये ICICI ने व्हिडिओकॉनला दिलेल्या 3 हजार 250 कोटींच्या कर्जाचं हे प्रकरण आहे. काय आहे प्रकरण? चंदा कोचर यांच्यावर आपल्या पतीला फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.  ICICI ने व्हिडिओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. व्हिडिओकॉन ग्रुपने या कर्जाच्या 86 टक्के रक्कम चुकवली नव्हती. 2017 मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आलं. व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी 2010 मध्ये न्य पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला (NRPL) 64 कोटी रुपये दिले होते. कोण आहेत चंदा कोचर? चंदा कोचर यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रातलं पुरुषांचं वर्चस्व मोडून काढून स्वत:ची ओळख बनवली. जगभरातल्या बँकिंग क्षेत्रात त्यांचं मोठं नाव झालं. एक मॅनेजमेंट ट्रेनी ते ICICI बँकेच्या सीईओ असा त्यांचा प्रवास आहे. फोर्ब्ज मॅगेझिनच्या जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत चंदा कोचर यांचा समावेश होता. त्याच चंदा कोचर यांना या गैरव्यवहारामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: