खुशखबर, 'या' मोठ्या बँकेत FD वर मिळतोय 3 लाख रुपयांचा इन्शुरन्स

खुशखबर, 'या' मोठ्या बँकेत FD वर मिळतोय 3 लाख रुपयांचा इन्शुरन्स

बँकनं जाहीर केलेल्या निवेदनानुसार यात बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. कारचं डाऊनपेमेंट, निवृत्ती योजना, मुलांचं शिक्षण या गोष्टींसाठीचं सेव्हिंगही आहे.

  • Share this:

मुंबई, 01 मे : देशातली सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआयनं नुकतीच एफडी ( फिक्स्ड डिपाॅझिट ) स्किम सुरू केलीय. या FD योजनेत चांगल्या व्याजाबरोबर अनेक फायदे मिळणार आहेत. ICICI आपल्या FD स्किम FD Xtra सोबत मोफत इन्शुरन्सही देतेय. बँकनं जाहीर केलेल्या निवेदनानुसार यात बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. कारचं डाऊनपेमेंट, निवृत्ती योजना, मुलांचं शिक्षण या गोष्टींसाठीचं सेव्हिंगही आहे.

FD एक्स्ट्रा डिपाॅझिटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ग्राहक आयसीआयसीआय बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊ शकतील. ते इंटरनेट बँकिंगद्वारे एफडी इन्कमसाठी अर्ज करू शकतात.

बँकेनं का केला लाँच नवा प्लॅन ? -  बजेटनंतर फिक्स्ड डिपाॅझिट आणि पोस्ट आॅफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बरीच सूट मिळालीय. आता बँकांमध्ये एफडीवर 40 हजार रुपयापर्यंत मिळणाऱ्या व्याजाचा TDS कापला जात नाही. आधी 10 हजारापर्यंतच्या  व्याजावरच टीडीएस कापला जात नव्हता.

FD Plus Life Cover-ICICI Bank FD Xtrबरोबर एक फ्री लाइफ कव्हर मिळतंय. FD LIFE सुरू केल्यानंतर ग्राहकांसाठी एक फ्री लाइफ कव्हर आहे. ज्यांचं वय 18 ते 50मध्ये आहे, त्यांना हे कव्हर मिळेल. हे कव्हर कमीत कमीत 2 वर्षांसाठी 3 लाख रुपयांच्या एफडीवर मिळेल.

लाइव्ह कव्हर पहिल्या वर्षासाठी मोफत आहे. दुसऱ्या वर्षासाठी FD होल्डर प्रीमियम देऊन रिन्यू करू शकतात. यात 3 लाखांचं कव्हरेज मिळेल. याप्रकारे 9 लाखांची FD केलीत तर 3 लाखांपर्यंत कव्हरेज मिळेल.

जाॅइंट होल्डिंग - ICICI बँकेचं FD अकाउंट सिंगल किंवा जाॅइंट असू शकतं. पण लाइव्ह कव्हरेज पहिल्या डिपाॅझिट होल्डरला मिळेल.

इंटरेस्ट पेआऊट -  बँक FDवर व्याज दर मासिक, तिमाही आणि सहा महिन्यांनी घेता येतं. FD Xtra सारखेही पर्याय आहेतच.

FD Income- यात कमीत कमी 24 महिन्यांसाठी कमीत कमी 2 लाख रुपयांचा FD करता येते. मॅच्युरिटीच्या वेळी मूळ रक्कम आणि व्याजाची गुंतवणूक केली जाईल.


VIDEO : 'फानी' धडकण्यापूर्वी विशाखापट्टणम समुद्रकिनाऱ्यावरचे भीषण दृश्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:18 PM IST

ताज्या बातम्या