Home /News /money /

ICICI बँकेचं नववर्षानिमित्त ग्राहकांना गिफ्ट, आता महिन्याला वाचतील एवढे पैसे

ICICI बँकेचं नववर्षानिमित्त ग्राहकांना गिफ्ट, आता महिन्याला वाचतील एवढे पैसे

ICICI बँकेनं कर्जावरील Interest Rates कमी केला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

    मुंबई, 01 डिसेंबर: देशातील सर्वात मोठी खासगी बँक म्हणून ICICI बँक ग्राहकांसाठी नव्या वर्षाची खास भेट घेऊन आली आहे. ICICI Bank Interest Rates कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ICICI Bankने आपल्या व्याज दरात 0.05 टक्के कपात केली आहे. त्यामुळे होम, ऑटो आणि पर्सनल लोनवरील EMI स्वस्त होणार आहे. तर नव्यानं लोन घेणाऱ्या ग्राहकांना याचा अधिक फायदा होणार आहे. आताचा स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR बेस्ड कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. आयसीआयसीआय बँकेनं 0.05 टक्के व्याजदर कमी केल्यानं ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे 0.5 टक्के पैशांची बचत होणार आहे. या निर्णयामुळे होम आणि ऑटो लोनवरील व्याजदर स्वस्त होणार आहे.  जुन्या ग्राहकांसोबतच नव्याने लोन घेणाऱ्यांना हा नियम बुधवारपासून लागू झाल्यानं फायदा होणार आहे. हेही वाचा-ATM मधून पैसे काढताना आजपासूनचा नवा नियम माहिती आहे का? पाह SBI ने काय सांगितलं दुकान खरेदी करण्यासाठी बँकेकडून  8.15 टक्के व्याजदराने कर्ज मिळत होतं आता ते 7.90 टक्क्यानं मिळणार आहे. यासोबतच बँकेनं एक्सटर्नल बेंचमार्क बेस रेट 8.05 टक्क्यांवरून 7.80 टक्क्यांवर आणली आहे. नव्या वर्षात भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. SBI घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त दरात होमलोन देणार आहे. या बँकेचं होमलोन 31 डिसेंबर 2019 पर्यंत घेतंल तर 1 जानेवारी 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. SBI ने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे. ग्राहकांसाठी कर्जात 8.15 पैकी 0.25 टक्के कपात करून 7.90 टक्के व्याज दर करण्यात आला आहे. आजापासून एनइएफटी करण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. एनइएफटीची सुविधा विनाशुल्क 24 तास ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मात्र ओटीपी आजपासून बंधनकारक असणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: ICICI bank

    पुढील बातम्या