Home /News /money /

गुंतवणूकदारांना 'या' बँकिंग शेअर्समध्ये यावर्षी कमाईची संधी, काय असेल टार्गेट? चेक करा

गुंतवणूकदारांना 'या' बँकिंग शेअर्समध्ये यावर्षी कमाईची संधी, काय असेल टार्गेट? चेक करा

ICICI Bank, HDFC Bank आणिAxis Bank यांचे शेअर्स 22 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. भांडवलाची मजबूत स्थिती, लायबेलिटीत होत असलेली सुधारणा आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची क्षमता यामुळे या बँकांच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे.

    मुंबई, 8 जानेवारी : मागील अनेक दिवसांपासून सुस्त असलेले भारतीय बँकिंग क्षेत्र (Banking Sector) सध्या शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेत आहे. 2022 मध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास होईल, असा त्यांचा विश्वास आहे. जेएम फायनान्शिअलला (JM financial) बँकिंग क्षेत्राची वार्षिक कमाई वाढ यंदा 49 टक्क्यांपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती बँकिंग क्षेत्राला अनुकूल आहे. ICICI Bank, HDFC Bank आणिAxis Bank यांचे शेअर्स 22 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. भांडवलाची मजबूत स्थिती, लायबेलिटीत होत असलेली सुधारणा आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची क्षमता यामुळे या बँकांच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. किरकोळ कर्जामधील वाढत्या स्पर्धेचा फायदा घेण्यासाठी या बँका चांगल्या स्थितीत आहेत. यासोबतच कर्जाची वाढती मागणीही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवडाभरातील 'सुपर स्टॉक्स', अवघ्या पाच दिवसात 90 ते 70 टक्के रिटर्न्स, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स? Axis Bank (CMP 750, Target 950) 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, अॅक्सिस बँकेचे एकूण एकत्रित उत्पन्न मागील तिमाहीच्या तुलनेत 3.36 टक्क्यांनी वाढून 20,996.6 कोटी झाले आहे. निव्वळ नफा 3,387 कोटी झाला आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेच्या कर्जाची वाढ 11 टक्क्यांनी आणि ठेवींमध्ये 17 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. फायनान्शिअल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात जेएम फायनान्शिअलने अॅक्सिस बँकेची सध्याची मार्केट प्राईज 750 रुपये मानली आहे. तर 950 रुपयांच्या टार्गेट प्राईजसह BUY रेटिंग दिले आहे. जेएम फायनान्शिअलचे म्हणणे आहे की अॅक्सिस बँकेचा शेअर 23 टक्क्यांच्या वाढीसह 950 रुपयांच्या टार्गेट प्राईजपर्यंत पोहोचू शकतो. HDFC बँक (CMP 1539, Target 1950) JM Financial च्या मते, 2022 हे HDFC साठी पुनरागमन वर्ष आहे. बँकेच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते आहे आणि त्यांच्याकडे 1950 रुपयांचं टार्गेट गाठण्याची प्रचंड क्षमता आहे. Multibagger stocks : 'या' पेनी स्टॉक्सवर यावर्षी नजर, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? ICICI बँक (CMP 785, Target- 1010) 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत ICICI बँकेच्या कर्जाची वाढ 15 टक्के आणि ठेवींमध्ये 17.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेच्या शेअर्स 1010 ची टार्गेट प्राईज पूर्ण करण्याची देखील जोरदार शक्यता आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Investment, Money

    पुढील बातम्या