IAS अधिकाऱ्याची कमाल, पुण्यातल्या या गावात होते टाॅयलेटमधून लाखोंची कमाई

IAS अधिकाऱ्याची कमाल, पुण्यातल्या या गावात होते टाॅयलेटमधून लाखोंची कमाई

आयुष प्रसाद यांनी आपल्या युनिक आयडियानं गावातल्या लोकांचं आयुष्यच बदललं

  • Share this:

मुंबई, 17 जून : असं म्हणतात एक आयडिया तुमचं आयुष्य बदलू शकते. हे सिद्ध केलं ते आयएएस अधिकारी आयुष प्रसाद यांनी. या अधिकाऱ्यानं आपल्या युनिक आयडियानं गावातल्या लोकांचं आयुष्यच बदललं. त्यांच्या अनोख्या प्लॅनमुळे आज सगळे गावकरी लाखोंची कमाई करतायत. पुण्याजवळ खेडमधल्या एका गावात ही गोष्ट घडली.

इथले लोक उघड्यावर शौच करायचे. टाॅयलेटचा उपयोग करतच नव्हते. अनेकदा अधिकाऱ्यांनी त्यांना समजवलं. पण काहीही उपयोग नव्हता. अशात आयुष प्रसादनं एक शक्कल लढवली. त्यांनी इथल्या लोकांना समजावलं. त्यांनी सांगितलं, टाॅयलेटचा उपयोग करा. नंतर सेप्टिक टँक रिकामी करून मातीत मिसळा. चांगलं खत मिळतं. शेतीतून लाखांची कमाई होऊ शकते.

सरकारी बँकांना 30 हजार कोटी मिळावेत म्हणून मोदी सरकारचा 'हा' प्लॅन

मातीचं परीक्षण सकारात्मक

पुणे मिररजवळ बोलताना IAS अधिकारी म्हणाले, पहिल्या वर्षी एकत्र केल्या गेलेल्या मातीचं परीक्षण करण्यासाठी कांदा आणि लसूण अनुसंधान निर्देशालयाशी ( DOGR ) संपर्क केला गेला. मेमध्ये याचे रिझल्ट खूप सकारात्मक आले. या मातीत कांद्याचं पिक भरघोस येत होतंच. पण इतर मातीच्या तुलनेत ही माती उत्पन्न 47 टक्के जास्त देत होती.

SBI नं ग्राहकांना दिल्या पैसे सुरक्षित ठेवण्याच्या 'या' टिप्स

आणखी दोन आयएएस अधिकाऱ्यांनी केली मदत

ही योजना अमलात आणण्यासाठी आयुष प्रसाद यांनी दोन आयएएस अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्या होत्या इंदिरा असवार आणि सोनाली अवचेत. आयुष यांना विरोध नाहीसा करणं आणि खड्ड्यांची सफाई करण्यासाठी लोकांना तयार करावं लागलं.त्यामुळे त्यांना पैसे मिळू शकले. सोनाली अवचेत यांनी सांगितलं, 'स्त्रिया पैसे कमवण्यासाठी इच्छुक होत्या. पण त्यांना अनेक प्रश्न होते. मग आम्ही त्यांना काही शौचालयाच्या खड्ड्यांजवळ घेऊन गेलो. ते रिकामे पडले होते. ते भरले. मग त्यांना दाखवलं चहाच्या पावडरीसारखा पदार्थ होता. आम्ही आमच्या हातांनी ते खड्डे रिकामे केले.'

'या' बँकेत खातं उघडलंत तर मिळतील 3 डेबिट कार्डस् आणि बऱ्याच सुविधा

या योजनेवर काम करत असलेले स्वयं सहायचा समूहचे प्रमुख दुर्गा नांगरे म्हणाले, ' सुरुवातीला विरोध होता. महिला म्हणायच्या टाॅयलेट साफ करणं शेतकऱ्यांचं काम नाही. स्वच्छतेबद्दलही चिंता होती. त्यानंतर हळूहळू अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बोलल्यावर सगळं सुरळीत झालं.'

पुणे मिररशी बोलताना आयुष प्रसाद म्हणाले, आमचा प्रयत्न यशस्वी झाला. आता गावातले लोक टाॅयलेटचा उपयोग करतात, शिवाय शेतीसाठी ती माती वापरून शेतीतून  लाखोंची कमाई करतायत.


VIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या