Home /News /money /

i phone ची विक्री घटली, थेट सीईओ टिम कुकचा पगार कापला

i phone ची विक्री घटली, थेट सीईओ टिम कुकचा पगार कापला

आयफोनच्या ( i phone)बळावर जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा किताब मिळवणाऱ्या Apple कंपनीची कामगिरी यावर्षी चांगली झाली नाही. याचा परिणाम Apple चे सीईओ टिम कुक यांच्या पगारावरही झालाय.

  मुंबई, 4 जानेवारी : आयफोनच्या ( i phone)बळावर जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा किताब मिळवणाऱ्या Apple कंपनीची कामगिरी यावर्षी चांगली झाली नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापार युद्धामुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. याचा परिणाम Apple चे सीईओ टिम कुक यांच्या पगारावरही झालाय. टिम कुक यांच्या पगारात 29 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची कपात झालीय. 2019 मध्ये टिम कुक यांना 1.16 कोटी डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये पगार मिळाला. त्याचवेळी 2018 मध्ये त्यांना 1.57 कोटी डॉलरचा पगार मिळाला होता. i phone ची विक्री कमी आयफोनच्या विक्रीत घट आल्याने अॅपल कंपनी उत्पादन वाढवण्यासाठी डिजिटल कंटेंट आणि इतर सेवांची विक्री करतेय. 2019 मध्ये अॅप्पलची एकूण विक्री 26 हजार 20 कोटी डॉलर होती. एक वर्षाच्या काळात अॅपलच्या विक्रीत केवळ 28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. विक्रीचं लक्ष्य 100 टक्के झालं असतं तर टिम कुक यांना 2018 प्रमाणेच 1.20 कोटी डॉलरचा बोनस मिळाला असता.

  (हेही वाचा : रुपया गडगडल्याने महागाईत आणखी भर, या गोष्टींना बसणार फटका)

  स्मार्टफोन्सची स्पर्धा आयफोनला वन प्लस, सॅमसंग या फोनची स्पर्धा आहे. या कंपन्या त्यांची एकाहून स्मार्टफोन्सची मॉडेल्स बाजारात आणतायत. त्यामुळे आयफोनची मागणी कमी झालीय. त्याचबरोबर आयफोनच्या तुलनेत या स्रार्टफोन्सची किंमतही कमी आहे. त्यामुळे मागच्या वर्षात आयफोनची विक्री घटलीय. याचीच भरपाई टिम कुक यांना भोगावी लागली. आता येणाऱ्या वर्षात i phone ची कामगिरी उंचावण्याचं आव्हान टिम कुक यांच्यासमोर आहे. ======================================================================
  Published by:Arti Kulkarni
  First published:

  Tags: I phone, Money

  पुढील बातम्या