मराठी बातम्या /बातम्या /मनी /Hurun Report: भारतानं युनिकॉर्न कंपन्यांच्या शर्यतीत ब्रिटनला टाकलं मागं; जगात मिळवला तिसरा क्रमांक

Hurun Report: भारतानं युनिकॉर्न कंपन्यांच्या शर्यतीत ब्रिटनला टाकलं मागं; जगात मिळवला तिसरा क्रमांक

मेक इन इंडिया असो वा आत्मनिर्भर भारत, या अभियानांच्या माध्यमातून भारतात नवीन कंपन्यांना मोठ्या प्रमाणात चालना दिली जात आहे. याचेच फलित म्हणून, यावर्षी भारतात एकूण 33 स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्नचा (Unicorn) दर्जा मिळाला आहे. हुरून रिसर्च इन्स्टिट्युटच्या (Hurun Research Institute) अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

पुढे वाचा ...

     मुंबई, 24 डिसेंबर- :   मेक इन इंडिया असो वा आत्मनिर्भर भारत, या अभियानांच्या माध्यमातून भारतात नवीन कंपन्यांना मोठ्या प्रमाणात चालना दिली जात आहे. याचेच फलित म्हणून, यावर्षी भारतात एकूण 33 स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्नचा   (Unicorn)   दर्जा मिळाला आहे. हुरून रिसर्च इन्स्टिट्युटच्या   (Hurun Research Institute)   अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे एकूण युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीमध्ये भारताने ब्रिटनलाही   (India beats UK)   मागे टाकत, जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान (India at number three) पटकावले आहे. बुधवारी (22 डिसेंबर 21) हुरूनने याबाबतची यादी प्रसिद्ध केली होती. कमीतकमी एक अब्ज डॉलर्स (सुमारे आठ हजार कोटी) एवढे बाजारमूल्य असणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना   (Start-Ups)   युनिकॉर्न हा दर्जा दिला जातो.

    पहिल्या स्थानावर अमेरिका-

    हुरून इन्स्टिट्यूटच्या यादीनुसार, अमेरिकेत यावर्षी 254 स्टार्टअप्सना युनिकॉर्न (Unicorn companies in US) दर्जा मिळाला. यानंतर अमेरिकेतील एकूण युनिकॉर्न कंपन्यांची संख्या 487 झाली आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये यावर्षी नव्याने झालेल्या 74 युनिकॉर्न कंपन्यांनंतर, देशातील एकूण युनिकॉर्न्सची (Unicorn companies in China) संख्या 301 झाली आहे. जगातील एकूण युनिकॉर्न्सपैकी 74 टक्के कंपन्या अमेरिका आणि चीनमध्ये आहेत.

    भारत अजून बराच मागे-

    भारताबाबत बोलायचं झाल्यास, देशात यावर्षी 33 कंपन्यांना युनिकॉर्न (Unicorn companies in India) दर्जा मिळाला आहे. यानंतर देशातील एकूण युनिकॉर्न कंपन्यांची संख्या 54 वर पोहोचली आहे. चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारत अद्याप बराच मागे आहे. दरम्यान, ब्रिटनला मात्र भारताने या यादीत मागे टाकले आहे. ब्रिटनमध्ये यावर्षी 15 स्टार्टअप्सना युनिकॉर्न दर्जा मिळाला. यानंतर ब्रिटनमधील एकूण युनिकॉर्न (Unicorn companies in UK) कंपन्यांची संख्या 39 वर पोहोचली आहे.

    (हे वाचा:Radhakishan S Damani यांनी इंडिया सिमेंट्समधील हिस्सा वाढवला, शेअरमध्ये तेजी)

    सिलिकॉन व्हॅलीत भारतीयांचा डंका-

    या यादीत सांगितलेली एक विशेष बाब म्हणजे, भारतातील युनिकॉर्न कंपन्यांची संख्या कमी असली, तरी यादीत बरेच भारतीय आहेत. अमेरिकेत मोठमोठ्या कंपन्यांची मुख्यालये असणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये (Silicon valley) सुमारे 50 हून अधिक युनिकॉर्न कंपन्यांचे फाउंडर हे भारतीय असल्याची माहिती या अहवालात दिली आहे.दरम्यान, हुरून रिपोर्ट इंडियाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य रिसर्चर अनस रहमान जुनैद यांनी सांगितले, की भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स उभारले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या एका वर्षातच देशातील स्टार्टअप्सची संख्या दुप्पट झाली आहे.एकीकडे जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय होताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे देशातील स्टार्टअप्सची संख्या वाढत आहे. यामुळे आपला देश आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने झपाट्याने पावलं टाकत असल्याचं दिसून येतं.

    First published:

    Tags: Business News, India, Money