मराठी बातम्या /बातम्या /मनी /Hurun India List 2021:या वर्षी या सेक्टरनं दिल्या सर्वांत जास्त नोकऱ्या, जाणून घ्या दुसऱ्या सेक्टरची परिस्थिती

Hurun India List 2021:या वर्षी या सेक्टरनं दिल्या सर्वांत जास्त नोकऱ्या, जाणून घ्या दुसऱ्या सेक्टरची परिस्थिती

कोरोना महामारी आणि कोरोना निर्बंधांमुळे 2021 हे वर्ष रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्रासाठी संमिश्र ठरलं.

कोरोना महामारी आणि कोरोना निर्बंधांमुळे 2021 हे वर्ष रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्रासाठी संमिश्र ठरलं.

कोरोना महामारी आणि कोरोना निर्बंधांमुळे 2021 हे वर्ष रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्रासाठी संमिश्र ठरलं.

नवी दिल्ली, 11 डिसेंबर: कोरोना महामारी आणि कोरोना निर्बंधांमुळे 2021 हे वर्ष रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्रासाठी संमिश्र ठरलं. 2021 मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (IT Sector) रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आघाडीवर राहिलं आहे. एका अहवालानुसार, 2021 मध्ये आतापर्यंत आयटी क्षेत्रात (Jobs in IT Sector) 14 लाख 97 हजार 501 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (Tata Consultancy Services) आयटीतील जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळं या वर्षात आतापर्यंत टीसीएसची (TCS) कर्मचारी संख्या पाच लाख सहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

Axis बँकेच्या प्रायव्हेट बँकिंग बिझनेस, बरगंडी प्रायव्हेट (Burgundy Private) आणि हुरुन इंडियाच्या (Hurun India) अहवालानुसार, 2021 मध्ये या वर्षात आयटी क्षेत्रानंतर आर्थिक सेवा क्षेत्रात (Financial Services Sector) सर्वाधिक नोकर भरती झाली. यावर्षी आतापर्यंत या क्षेत्रात 10 लाख 36 हजार 605 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा-  लक्ष द्या! ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा खराब होईल तुमची इमेज; वाचा सविस्तर

 2021 मध्ये विविध क्षेत्रात झालेली नोकर भरती

या आर्थिक क्षेत्रातील सर्वात जास्त नोकऱ्या एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) दिल्या आहेत. या वर्षी एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख 20 हजार 116 वर गेली आहे. ऑटोमोबाईल (Automobile) आणि ऑटो कंपोनंट्स सेक्टरमध्ये यावर्षी पाच लाख 57 हजार 191 लोकांना रोजगार मिळाला. मदरसन सुमी सिस्टम्सनं (Motherson Sumi Systems) सर्वाधिक भरती केली आहे. आरोग्य सेवा क्षेत्र (Healthcare Sector) हे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक रोजगारक्षम क्षेत्र ठरलं आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये यावर्षी पाच लाख 40 हजार 686 जणांची भरती करण्यात आली.

बांधकाम क्षेत्रात पाच लाखांहून अधिक जणांना मिळाल्या नोकऱ्या

यावर्षी आतापर्यंत बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रात (Construction and engineering sector) पाच लाख 25 हजार 145 लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे क्षेत्र पाचव्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ सेवा क्षेत्रात (service sector) पाच लाख 1 हजार 818, दूरसंचार क्षेत्रात (Telecommunications sector) तीन लाख 44 हजार 199, ग्राहकोपयोगी (Consumer) वस्तू क्षेत्रात तीन लाख 29 हजार 785, धातू आणि खाण (Metals and Mining) क्षेत्रात दोन लाख 38 हजार 567 आणि बांधकाम साहित्य क्षेत्रात (Construction Material Sector) 1 लाख 92 हजार 742 लोकांना रोजगार मिळाला आहे.

हेही वाचा-  सावधान! तुम्हाला मिळालेलं Job Offer Letter खोटं तर नाही ना? 2 मिनिटांत असं करा चेक

 टॉप-500 कंपन्यांची व्हॅल्यू झाली जीडीपीपेक्षा जास्त

हुरुनच्या अहवालानुसार, कोरोना महामारी असूनही मूल्यांकनाच्या बाबतीत भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये यावर्षी चांगली वाढ झाली आहे. या सर्व 500 कंपन्यांचं एकूण मूल्य सुमारे 228 डॉलर्स इतकं आहे. हे मूल्य आर्थिक वर्ष 2021मधील भारताच्या जीडीपीपेक्षा (GDP) जास्त आहे. यातील 200 कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू (Market Value) यावर्षी दुप्पट झाल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Job